बिना रॉय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बिना रॉय, बिना राय तथा कृष्णा सरीन (४ जून, १९३१:लाहोर, पाकिस्तान - ६ डिसेंबर, २००९:मुंबई, महाराष्ट्र, भारत) ही हिंदी चित्रपट अभिनेत्री होती. कृष्णधवल चित्रपटांतील प्रमुख नायिका समजली जाणाऱ्या रॉयने अनारकली, ताज महल सह २५ पेक्षा अधिक चित्रपटांतून अभिनय केला.

लाहोरमध्ये जन्मलेली रॉय भारताच्या फाळणी दरम्यान आपल्या कुटुंबासह लखनौ येथे स्थलांतरित झाली व नंतर चित्रपटांतून कामे करण्यासाठी ती मुंबईस आली. काली घटा हा तिचा पहिला चित्रपट होता.

रॉयने अभिनेता प्रेम नाथ याच्याशी लग्न केले. त्यांचा मुलगा प्रेम किशन हा चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका निर्माता आहे.