Jump to content

आशा पारेख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आशा पारेख
जन्म २ ऑक्टोबर, १९४२ (1942-10-02) (वय: ८१)
मुंबई
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट)
कारकीर्दीचा काळ १९५२ - चालू

आशा पारेख ( २ ऑक्टोबर १९४२) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. १९५९ ते १९७३ सालांदरम्यान आशा पारेख बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी नायिकांपैकी एक होती. राजेश खन्नासोबत प्रसिद्ध जोडी असलेल्या पारेखने दिल देके देखो, जब प्यार किसीसे होता है, तीसरी मंझील इत्यादी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. १९७१ साली प्रदर्शित झालेल्या कटी पतंग ह्या चित्रपटासाठी आशा पारेखला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार‎ मिळाला होता.

१९९२ साली तिच्या अभिनयामधील योगदानासाठी भारत सरकारने पारेखचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला.

आशा पारेखचे चरित्रग्रंथ

[संपादन]
  • Asha Parekh The Hit Girl (इंग्रजी, लेखक : खलीद मोहम्मद)

बाह्य दुवे

[संपादन]

इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील आशा पारेख चे पान (इंग्लिश मजकूर)