Jump to content

शबाना आझमी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शबाना आझमी
शबाना आझमी, २०१५ मधील एक छायाचित्र
जन्म शबाना आझमी
१८ सप्टेंबर, १९५० (1950-09-18) (वय: ७५)
हैदराबाद,तेलंगाणा, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
वडील कैफी आझमी
आई शौकत आझमी
पती जावेद अख्तर

शबाना आझमी ( १८ सप्टेंबर १९५०) ही एक भारतीय अभिनेत्री आहे.ती प्रसिद्ध कवी कैफी आझमी व रंगभूमी कलाकार शौकत आझमी यांची कन्या आहे. ती भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था पुणे, या संस्थेची माजी विद्यार्थिनी आहे. तिने सन १९७४ मध्ये आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरू केली. तिने समांतर सिनेमातही कामे केलीत.[][] तिने आपल्या अभिनयाने अनेक पुरस्कार प्राप्त केले.त्यात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा समावेश आहे.तिला सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून ५ वेळा पुरस्कार मिळाला आहे व अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.[][] तिला पाच फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले आहेत.[] सन १९८८ मध्ये तिला भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.

निवडक चित्रपटसूची

[संपादन]

शबाना आझमी यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक वास्तववादी आणि सामाजिक प्रश्नांवर आधारित चित्रपटांत काम केले आहे. []

वर्षचित्रपटदिग्दर्शकसहकलाकारभूमिकानोंदी
१९७४अंकुरश्याम बेनेगलअनंत नागलक्ष्मीपदार्पण; विजेता: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (सर्वोत्कृष्ट अभिनेत्री) []
१९७७अमर अकबर अँथनीमनमोहन देसाईविनोद खन्ना, ऋषी कपूरलक्ष्मीब्लॉकबस्टर; सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
१९७७शतरंज के खिलाडीसत्यजित रायसंजीव कुमार, सईद जाफरीखुर्शीदऐतिहासिक चित्रपट
१९८२अर्थमहेश भट्टकुलभूषण खरबंदापूजा मल्होत्राविजेता: राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेर पुरस्कार (सर्वोत्कृष्ट अभिनेत्री)
१९८३मासूमशेखर कपूरनसीरुद्दीन शाहइंदू मल्होत्रानावाजलेला कौटुंबिक चित्रपट
१९८३मंडीश्याम बेनेगलस्मिता पाटीलरुक्मिणी बाईसामाजिक चित्रपट
१९८४पारगौतम घोषनसीरुद्दीन शाहरामाविजेता: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (सर्वोत्कृष्ट अभिनेत्री)
१९९६फायरदीपा मेहतानंदिता दासराधाआंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित आणि वादग्रस्त
१९९९गॉडमदरविनय शुक्लामिलिंद गुणाजीरंभीविजेता: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (सर्वोत्कृष्ट अभिनेत्री) []
२००५वॉटरदीपा मेहताजॉन अब्राहम, लिसा रेशकुंतलाऑस्करसाठी नामांकित चित्रपट
२०१६नीरजाराम माधवानीसोनम कपूररमा भानोतविजेता: फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार
२०२३रॉकी और रानी की प्रेम कहानीकरण जोहरधर्मेंद्र, जया बच्चनजामिनी चॅटर्जीसुपरहिट व्यावसायिक चित्रपट

पुरस्कार आणि सन्मान

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 PTI (22 July 2005). "Parallel cinema seeing changes: Azmi(इंग्रजी मजकूर)". 2012-11-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 31 January 2009 रोजी पाहिले.
  2. K., Bhumika (21 January 2006). "Shabana's soap opera(इंग्रजी मजकूर)". Chennai, India. 2012-01-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 31 January 2009 रोजी पाहिले.
  3. Nagarajan, Saraswathy (18 December 2004). "Coffee break with Shabana Azmi(इंग्रजी मजकूर)". Chennai, India. 2004-12-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 31 January 2009 रोजी पाहिले.
  4. "Directorate of Film Festival(इंग्रजी मजकूर)" (PDF).
  5. "Shabana Azmi Filmography". IMDb (इंग्रजी भाषेत). १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  6. "22nd National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals (इंग्रजी भाषेत). १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  7. "46th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals (इंग्रजी भाषेत). १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  8. "Padma Awards Directory" (PDF). Ministry of Home Affairs, India (इंग्रजी भाषेत). १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.