दीपिका पडुकोण
| दीपिका पडुकोन-भावनानी | |
|---|---|
|
दीपिका पादुकोण | |
| जन्म |
दीपिका प्रकाश पडुकोन ५ जानेवारी, १९८६ कोपनहेगन, डेन्मार्क |
| इतर नावे | दिपू |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| कार्यक्षेत्र | अभिनय, मॉडेलिंग |
| कारकीर्दीचा काळ | २००६-चालू |
| भाषा | हिंदी, कोंकणी, कानडी, इंग्रजी |
| प्रमुख चित्रपट | बाजीराव मस्तानी, पिकू, पद्मावत इत्यादी |
| वडील | प्रकाश पडुकोण |
| आई | उज्ज्वला पडुकोण |
| पती | |
| अधिकृत संकेतस्थळ | https://www.deepikapadukone.com |
दीपिका पदुकोण ( ५ जानेवारी १९८६) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट ओम शांती ओम हा आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. विविध भारतीय चित्रपटात काम करून तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहेच पण त्याचबरोबर ती आता हॉलिवूडमध्येसुद्धा कामे करीत आहे.२०१७ साली तिचा विन डिझेल सोबत XXX हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सर्वात जास्त मानधन घेणारी नटी आहे. तिने स्वतःचे वस्त्र उद्योग उघडले आहे.
खाजगी जीवन
[संपादन]बॅडमिंटनपटू प्रकाश पडुकोण आणि उज्ज्वला या दांपत्याच्या पोटी कोपनहेगन (डेन्मार्क) येथे दीपिकाचा जन्म झाला. एक छोट्या गटात राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत ती बॅडमिंटन खेळली, परंतु एक फॅशन मॉडेल होण्यासाठी खेळण्यातला रस कमी करून ती चित्रपटाकडे वळली आणि ऐश्वर्या या कन्नड चित्रपटातून चित्रपटसृष्टीत २००६मध्ये पदार्पण केले. तिची मातृभाषा कोकणी आहे. शिवाय तिला इंग्लिश भाषा, हिंदी भाषा, कन्नड या भाषा येतात. बेंगळुरूमधील सोफिया हायस्कूलमध्ये तिचे शिक्षण झाले. दीपिका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सोबत विवाहित आहे.
वैयक्तिक आयुष्य
[संपादन]
पदुकोण तिच्या कुटुंबा घट्ट नाते ठेवते आणि ती बेंगलुरुला नियमितपणे त्यांना भेटायला जाते.[१] ती मुंबईतील प्रभादेवी परिसरात राहते आणि तिथे तिला तिच्या पालकांची ओढ जाणवते तिने मान्य केले आहे.[२][३] दीपिका हिंदू धर्माचे आचरण करते व धर्माला तिच्या आयुष्याचा महत्त्वाचा पैलू मानते. ती वारंवार हिंदू मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळांना भेटी देते.[४]
२००८ मध्ये बचना ऐ हसीनोच्या चित्रीकरणादरम्यान पदुकोणचे सह-कलाकार रणबीर कपूरसोबत प्रेमसंबंध सुरू झाले.[५] तिने हे लपवून न ठेवता मानेवर त्याची आद्याक्षरे गोंदवून घेतली होती.[६] तिने म्हटले आहे की या नात्याचा तिच्यावर खोल परिणाम झाला असून यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला आहे तसेच लोकांशी अधिक मिसळायला लागली आहे.[७] एका वर्षानंतर हे जोडपे वेगळे झाले;[८] त्यानंतर एका मुलाखतीत तिने बराच काळ विश्वासघात झाल्यासारखे वाटल्याचे सांगितले. २०१० च्या एका मुलाखतीत पदुकोणने त्याच्यावर इतरांशी संबंध ठेवून आपल्याला फसवल्याचा आरोप केला. कपूरने तो मान्य केला.[९][१०][११] 'ये जवानी है दिवानी'मध्ये एकत्र काम करताना त्यांनी पुन्हा मैत्री प्रस्थापित केली.[१२]
यानंतर पदुकोणने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा करणे टाळले. २०१७ मध्ये तिने आपला अनेकदा सह-कलाकार असलेल्या रणवीर सिंगसोबतच्या तिच्या नात्याबद्दल भाष्य केले. हे जोडपे ऑगस्ट २०१२ पासून डेटिंग करत होते.[१३] ऑक्टोबर २०१८ मध्ये त्यांनी लग्ना ठरवल्याची घोषणा केली.[१४] पुढील महिन्यात इटलीतील लेक कोमो येथे पारंपारिक कोकणी हिंदू आणि शीख आनंद कारज समारंभात त्यांचे लग्न झाले.[१५][१६] ८ सप्टेंबर २०२४ रोजी तिने त्यांची मुलगी दुआ हिला जन्म दिला.[१७]
कारकीर्द
[संपादन]उंच आणि शेलाटा बांधा लाभलेल्या दीपिकाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली. २००६ मध्ये दीपिकाने कन्नड चित्रपट ऐश्वर्या मध्ये अभिनेता उपेंद्र याच्यासोबत भूमिका करून चित्रपटात काम करायला सुरुवात केली. त्यानंतर २००७ मध्ये फराह खानच्या ओम शांती ओम मध्ये अभिनेता शाहरूख खानसोबत प्रमुख भूमिका केली. या चित्रपटाने तिला मोठे व्यावसायिक यश आणि पुरस्कारही मिळवले.
फोर्ब्जच्या यादीत १०वी
[संपादन]दीपिका पदुकोण ही जगातली सर्वोत्तम दहाव्या क्रमांकाची अभिनेत्री असल्याचे फोर्ब्जच्या यादीवरून समजते. तिचे १ जून २०१५ ते ३१ मे २०१६ या काळातले उत्पन्न एक कोटी डॉलर्स असल्याचा अंदाज आहे.तिने १० कोटी आयकर भरला आहे.
फुटबॉल विश्वचषक २०२२ ट्रॉफीचे अनावरण
[संपादन]आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने जगभरातल्या चाहत्यांना भुरळ घालणारी दीपिका नक्कीच एक इंटरनॅशनल स्टार आहे. कतार मध्ये सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक २०२२ या जागतिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फिफा विश्वचषक ट्रॉफीचे अनावरण दीपिका पदुकोणच्या हस्ते होणार आहे. 18 डिसेंबर रोजी, दीपिका पदुकोण लुसेल आयकॉनिक स्टेडियमवर वर्ल्ड कप ट्रॉफीचे अनावरण करणार आहे. तिच्या तमाम चाहत्यांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.
निवडक चित्रपट
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील दीपिका पडुकोण चे पान (इंग्लिश मजकूर)

संदर्भ
[संपादन]- ↑ Muthanna, Anjali (25 May 2013). "Deepika makes time for family in Bangalore". The Times of India. 28 September 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. मे २५, २०१३ रोजी पाहिले.
- ↑ "Deepika Padukone's South Indian home". Hindustan Times. 7 November 2011. 10 April 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. सप्टेंबर ४, २०१३ रोजी पाहिले.
- ↑ Ahmed, Afsana (23 June 2013). "I want to be the first girl Ranbir Kapoor directs: Deepika Padukone". Hindustan Times. 3 February 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. सप्टेंबर ४, २०१३ रोजी पाहिले.
- ↑ Batra, Ankur (8 September 2011). "Deepika Padukone on a religious trip". The Times of India. 28 September 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. मे २५, २०१३ रोजी पाहिले.
- ↑ "I've been dating Deepika for few weeks: Ranbir Kapoor". Sify. 17 March 2008. 31 December 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. मार्च १७, २००८ रोजी पाहिले.
- ↑ Behrawala, Krutika (17 August 2012). "Tattoo Tales". The Indian Express. 8 February 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. सप्टेंबर ४, २०१३ रोजी पाहिले.
- ↑ Drum. Drum Publications (East Africa). 2008. p. 98. 14 November 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
- ↑ Lalwani, Vickey (3 November 2009). "Deepika-Ranbir call it quits!". The Times of India. 25 October 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. डिसेंबर १०, २००९ रोजी पाहिले.
- ↑ "He cheated on me: Deepika". Hindustan Times. 28 September 2010. 17 November 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. सप्टेंबर ४, २०१३ रोजी पाहिले.
- ↑ Punoose, Rukhmini. "Deepika on a dream run". Verve. 27 September 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. सप्टेंबर ४, २०१३ रोजी पाहिले.
- ↑ "Yes, I cheated: Ranbir". The Times of India. 30 September 2011. 3 December 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. सप्टेंबर ४, २०१३ रोजी पाहिले.
- ↑ Tandon, Raedita (28 June 2013). "'Ranbir and I have become a lot closer now' – Deepika Padukone". Filmfare. 2 October 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. सप्टेंबर ४, २०१३ रोजी पाहिले.
- ↑ Choudhary, Anuradha (28 December 2018). "Exclusive and explosive: Deepika Padukone's first interview after marriage". Filmfare. 16 April 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. जानेवारी ८, २०२० रोजी पाहिले.
- ↑ "Deepika Padukone and Ranveer Singh announce wedding date". The Indian Express. 21 October 2018. 21 October 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. ऑक्टोबर २१, २०१८ रोजी पाहिले.
- ↑ "Deepika Padukone, Ranveer Singh are married now, wedding ceremony ends in Italy". Hindustan Times. 14 November 2018. 14 November 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. नोव्हेंबर १४, २०१८ रोजी पाहिले.
- ↑ "Ranveer Singh-Deepika Padukone wedding: Sikh body upset over Anand Karaj performed outside gurdwara". Hindustan Times. 19 November 2018. 19 December 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. डिसेंबर १९, २०१८ रोजी पाहिले.
- ↑ "Deepika Padukone, Ranveer Singh blessed with baby girl". Hindustan Times. 8 September 2024. सप्टेंबर ८, २०२४ रोजी पाहिले.