मृत्युदंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
येशू ख्रिस्ताला दिलेला मृत्यूदंड

मृत्युदंड हा एखाद्या व्यक्तीला गुन्हा सिद्ध झाल्यानंतर न्यायसंस्थेकडून सुनवला जाणारा सर्वात कठोर शिक्षेचा प्रकार आहे. ऐतिहासिक काळांपासून जवळजवळ सर्व समाज व्यवस्थांमध्ये विविध प्रकारे मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेली आहे. मृत्युदंडाची अंमलबजावणी करण्याचे अनेक मार्ग आहेत. २०१० साली फाशी, शिरच्छेद, विद्युत खुर्ची, गोळीबार, विषारी वायू व प्राणघातक इंजेक्शन हे मृत्युदंडाचे प्रकार वापरात होते.

मृत्युदंडाचा जागतिक वापर[संपादन]

Cesare Beccaria, Dei delitti e delle pene

सध्या जगातील ५८ देशांच्या न्यायसंस्थांमध्ये मृत्युदंडाची तरतूद आहे तर एकूण ९५ देशांनी मृत्युदंडावर बंदी घातली आहे. युरोपियन संघाच्या सर्व सदस्य देशांमध्ये मृत्यूदंडास मनाई आहे.[१] २००७ साली संयुक्त राष्ट्रे आम सभेने जगातील सर्व राष्ट्रांनी मृत्युदंड शिक्षेवर स्थगिती आणावी असा प्रस्ताव सादर केला होता, परंतु चीन, भारत, अमेरिकेची संयुक्त संस्थानेइंडोनेशिया ह्या जगातील चार सर्वाधिक लोकसंख्येच्या देशांसह अनेक देशांनी ह्या प्रस्तावाला विरोध दर्शवला.[२][३][४] भारतामध्ये मृत्युदंडाची शिक्षा अत्यंत क्वचित सुनावली जाते. भारतात १९९५ सालापासून आजवर केवळ दोन गुन्हेगाराला (धनंजय चॅटर्जी) आणि (अजमल कसब -२०१२) यांना मृत्युदंड दिला गेला आहे.

सूचक
  संपूर्ण बंदी
  केवळ युद्धकाळात सुनावणी
  वापरात नाही
  सुनावणी चालू

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: