मीनाक्षी शेषाद्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शशिकला शेषाद्री ऊर्फ मीनाक्षी शेषाद्री (तमिळ: மீனாக்ஷி சேஷாத்திரி ; रोमन लिपी: Meenakshi Seshadri) (१६ नोव्हेंबर, इ.स. १९६३ ; सिंद्री, झारखंड - हयात) ही तमिळ-भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. हिने हिंदीतमिळ चित्रपटांमधून अभिनय केला आहे. हिने वयाच्या १७व्या वर्षी इ.स. १९८१ सालचा मिस इंडिया किताब जिंकला होता. मिस इंडिया किताब जिंकणारी ही सर्वांत तरूण स्त्री होय.

कारकीर्द[संपादन]

मीनाक्षीने इ.स. १९८२ साली पेंटर बाबू या हिंदी चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. या चित्रपटात तिची नायिकेची भूमिका होती व तिच्यासह राजीव गोस्वामी नायकाच्या भूमिकेत होता. त्यानंतर इ.स. १९८३ च्या सुभाष घई-दिग्दर्शित हीरो या चित्रपटाने तिला कीर्ती मिळवून दिली. दामिनी या चित्रपटातील तिची भूमिका विशेष गाजली.

बाह्य दुवे[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.