Jump to content

गोविंदा (अभिनेता)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गोविंदा या पानावरून पुनर्निर्देशित)
गोविंदा
गोविंदा
जन्म गोविंदा अरुण आहुजा
२१ डिसेंबर, १९६३ (1963-12-21) (वय: ६०)
विरार, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता, राजकारण
कारकीर्दीचा काळ

अभिनय - १९८६-सद्य

खासदार ३ जून २००४ - मे २००९
भाषा हिंदी
प्रमुख चित्रपट  • हिरो नं. १,
 • कुली नं. १,
 • जिस देश में गंगा रहता है,
 • साजन चले ससुराल
प्रमुख टीव्ही कार्यक्रम छप्पर फाड के
वडील अरुण आहुजा
आई निर्मलादेवी आहुजा
पत्नी सुनिता अहुजा
अपत्ये नर्मदा आहुजा, यशवर्धन आहुजा
धर्म हिंदू


गोविंदा अरुण आहुजा (जन्म : विरार-मुंबई, २१ डिसेंबर १९६३) हे भारतीय चित्रपट अभिनेते आहेत. गोविंदाने अनेक चित्रपटांमध्ये विविध पात्रे केली असून त्यापैकी त्यांचे विनोदी भूमिका असलेले चित्रपट विशेष गाजले. विनोदी संवादफेकीच्या उत्कृष्ट शैलीमुळे त्यांचे विनोदी चित्रपट हिट ठरले. गोविंदा आहुजा असे नाव असले तरी ते चित्रपटांत व चाहत्यांमध्ये गोविंदा याच नावाने ओळखले जातात. गोविंदा यांचा देशात खूप मोठा चाहता वर्ग आहे.

गोविंदाची आई निर्मला आहुजा अभिनेत्री आणि गायिका होती. एक चित्रपट निर्मितीच्या कामात प्रचंड नुकसान झाल्याने गोविंदाच्या वडिलांना मुंबईतील कार्टर रोडचे घर विकूून विरारला जावे लागले. तेथेच गोविंदाचा जन्म झाला.

गोविंदा वसईच्या काॅलेजातून बी.काॅम झाले आहेत.

राजकीय कारकीर्द

[संपादन]

गोविंदा हे माजी खासदार आहेत. ते उत्तर मुंबई मतदार संघामधून लोकसभा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढविली होती. गोविंदा मुळचे विरार(मुंबई)चे आहेत.

वैयक्तिक जीवन

[संपादन]

गोविंदा हे वैयक्तिक जीवनात मातृभक्त म्हणून ओळखले जातात. त्यांना आपल्या आईबद्दल विशेष प्रेम होते. गोविंदा हे साधू संतांचा सन्मान करतात. मात्र त्यांनी सूरत येथील होळीच्या कार्यक्रमात येऊन कथित यौन शोषणाच्या आरोपाखाली कारागृहात बंद असलेल्या संत आसाराम बापूंचे समर्थन केले.