करिश्मा कपूर
Appearance
करिश्मा कपूर | |
---|---|
करिश्मा कपूर | |
जन्म |
करिश्मा कपूर २५ जून, १९७४ मुंबई, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
वडील | रणधीर कपूर |
आई | बबिता |
करिश्मा कपूर (टोपणनाव: लोलो ; रोमन लिपी: Karisma Kapoor ;) ( २५ जून, इ.स. १९७४) ही हिंदी चित्रपटांतील अभिनेत्री आहे. इ.स. १९९१ साली चित्रपटसॄष्टीत पदार्पण केलेल्या करिश्माने कारकिर्दीत अनेक यशस्वी व्यावसायिक चित्रपटांतून कामे करत इ.स. १९९० च्या दशकात आघाडीची अभिनेत्री म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत स्थान मिळवले. तिने भूमिका साकारलेल्या चित्रपटांपैकी राजा हिंदुस्तानी (इ.स. १९९६), दिल तो पागल है (इ.स. १९९७), फिजा (इ.स. २०००), झुबैदा (इ.स. २००१) हे चित्रपट विशेष गाजले.
हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता रणधीर कपूर तिचे वडील, तर अभिनेत्री बबिता तिची आई आहे. तिची बहीण करीना कपूर हीदेखील हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत