नर्गिस दत्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नर्गिस दत्त
नर्गिस,आवारा चित्रपटात.
जन्म फातिमा रशीद
जून २, १९२९
मृत्यू ३ मे, इ.स. १९८१
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय

नर्गिस दत्त तथा फातिमा रशीद (१ जून, इ.स. १९२९ - ३ मे, इ.स. १९८१) ही एकभारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री होती. हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका म्हणून नर्गिसचा उल्लेख होतो. तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण बाल कलाकार म्हणून १९३५मध्ये तलाश-ए-इश्क या सिनेमाने केले तर अभिनेत्री म्हणून कारकिर्दीस सुरूवात १९४२ साली तमन्ना या चित्रपटाने केली. तेव्हापासून सालापासून ते १९६०च्या दशकापर्यंत वीस वर्षांच्या कारकिर्दीत नर्गिसने अनेक सिनेमांतून काम केले. त्यातील अनेक तिने सहअभिनेता आणि सिनेनिर्माता राज कपूर यांजबरोबर केले आहेत.

दत्तच्या मदर इंडिया या चित्रपटातील राधाच्या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. त्यानंतर एक वर्षात या चित्रपटातील आपल्या सहकलाकार सुनील दत्तशी लग्न करून नर्गिस दत्तने चित्रपटअभिनयातून निवृत्ती घेतली. त्यानंतर तिने रात और दिन सारख्या चित्रपटांत अपवादाने अभिनय केला. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.