विद्या बालन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विद्या बालन
जन्म विद्या बालन
१ जानेवारी, १९७८ (1978-01-01) (वय: ४३)
पालक्काड, केरळ
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २००३ - चालू
प्रमुख टीव्ही कार्यक्रम हम पांच
पती सिद्धार्थ रॉय कपुर

विद्या बालन(मल्याळम: വിദ്യാ ബാലന്‍, तमिळ: வித்யா பாலன், जन्मः १ जानेवारी १९७८) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. सध्या भारतामधील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी मानल्य जाणाऱ्या विद्याला आजवर एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, ५ फिल्मफेअर पुरस्कार, ५ स्क्रीन पुरस्कार इत्यादी अनेक सिने-[पुरस्कार]] मिळाले आहेत. २०१४ साली भारत सरकारने तिला पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले. तिने आतापर्यंत तमिळ, हिंदी, मल्याळम आणि बंगाली भाषेत चित्रपटांत कामे केली आहेत.

१९९५ सालच्या हम पांच ह्या झी टीव्हीवरील विनोदी धारावाहिकामध्ये काम करून विद्याने अभिनयाची सुरूवात केली. २००५ सालच्या परिणीता ह्या हिंदी चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तिने अनेक चित्रपटांमध्ये कामे केली आहेत.

चित्रपट कारकीर्द[संपादन]

वर्ष चित्रपट भूमिका टीपा
2003 भालो थेको आनंदी बंगाली चित्रपट
2005 परिणीता ललिता फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार
2006 लगे रहो मुन्ना भाई जान्हवी
2007 गुरू मीनाक्षी "मीनू" गुप्ता-सक्सेना
2007 सलाम-ए-इश्क तेहेझेब हुसैन
2007 एकलव्य
2007 हे बेबी इशा
2007 भूल भुलैया अवनी  चतुर्वेदी
2008 हल्ला बोल स्नेहा
2008 किस्मत कनेक्शन प्रिया
2009 पा विद्या फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
2010 इश्किया कृष्णा  वर्मा  फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री समीक्षक पुरस्कार
2011 नो वन किल्ड जेसिका सब्रीना लाल
2011 द डर्टी पिक्चर रेश्मा सर्वोत्तम अभिनेत्री राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
2012 कहानी विद्या  वेंकटेशन  बॅगची फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
2013 घनचक्कर नीतू  अठराय
2014 शादी के साईड इफेक्ट्स तृषा मलिक
2014 बॉबी  जासूस बिल्किस  "बॉबी " अहमद
2015 हमारी  अधुरी  कहाणी वसुधा  प्रसाद
2016 एक्क अलबेला गीता बाली
2016 कहाणी 2: दुर्गा राणी सिंग विद्या सिन्हा / दुर्गा राणी सिंग
2017 बेगम जान बेगम जान

बाह्य दुवे[संपादन]