ऋषी कपूर
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
ऋषी कपूर | |
---|---|
ऋषी कपूर | |
जन्म |
ऋषी कपूर ४ सप्टेंबर, १९५२ मुंबई, मुंबई राज्य, भारत (आता मुंबई, महाराष्ट्र, भारत) |
मृत्यू |
३० एप्रिल, २०२० (वय: ६७) मुंबई, महाराष्ट्र, भारत |
इतर नावे | चिंटू |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
कारकीर्दीचा काळ | १९७० - २०१६ |
प्रमुख चित्रपट | चांदनी आणि बॉबी |
वडील | राज कपूर |
पत्नी | नीतू सिंग (१९७९) |
अपत्ये | रणबीर कपूर |
ऋषी कपूर ( ४ सप्टेंबर १९५२, मृत्यू: ३० एप्रिल २०२०) हा एक भारतीय सिने अभिनेता व दिग्दर्शक होता. १९७० सालच्या मेरा नाम जोकरमध्ये छोटी भूमिका करणाऱ्या ऋषीने १९७३ साली बॉबी ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून गेली ४० वर्षे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत व त्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती. इसवी सनाच्या १९९० च्या व २००० च्या दशकात नायकाच्या भूमिका करणा-या ऋषी कपूर यांनी वाढत्या वयानुसार आपल्या भूमिकांच्या स्वरूपात बदल केला. 'कुछ तो है. या सिनेमात ऋषी कपूर यांनी रंगविलेला सायको किलर खुर्चीला खिळवून ठेवतो तर अग्निपथ(नवीन) मध्ये रौफ लाला हा भीतिदायक वाटतो. औरंगजेब सिनेमातील त्याची भूमिका निर्दयी वाटते.30 एप्रिल २०२०रोजी त्यांचे निधन झाले आहे.
ऋषी कपूरची भूमिका असलेले चित्रपट (सुमारे १२०)
[संपादन]आत्मचरित्र
[संपादन]ऋषी कपूरने ‘खुल्लम खुल्ला’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.
ऋषी कपूरच्या चित्रपटांतील गाजलेली गाणी
[संपादन]ऋषी कपूरसाठी किशोर कुमार, मोहम्मद रफी अशा अनेक गायकांनी गाणी म्हटली आणि ती सगळीच गाणी यशस्वी ठरली. या गाण्यांचे विविध सभागृहांत शोज होतात आणि त्या शोजना ऋषी कपूरची हजेरी असते, व त्यावेळी ते गाण्यांमागचे किस्से संगतात. २०१७ सालापर्यंत असे शोज मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये, बंगलोरमध्ये आणि पुण्यात झाले आहेत.
बाह्य दुवे
[संपादन]- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील ऋषी कपूर चे पान (इंग्लिश मजकूर)