आलिया भट्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.
आलिया भट्ट
जन्म आलिया महेश भट्ट
१५ मार्च, १९९३ (1993-03-15) (वय: २८)
मुंबई
राष्ट्रीयत्व ब्रिटिश
कार्यक्षेत्र अभिनेत्री, मॉडेल
कारकीर्दीचा काळ इ.स. २०१२ - चालू
भाषा हिंदी
पुरस्कार फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार
वडील महेश भट्ट
आई सोनी राजदान भट्ट
नातेवाईक पूजा भट्ट (सावत्र बहीण)

आलिया भट्ट (जन्म: १५ मार्च १९९३) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या स्टुडन्ट ऑफ द इयर ह्या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. तिने टू स्टेट , शानदार, हायवे,हम्पटी शर्मा कि दुल्हनिया, कपुर ॲंन्ड सन्स, ह्या चित्रपटात उल्लेखनीय काम केल आहे. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

जीवन[संपादन]

Alia Bhatt Starbucks opening.jpg

आलिया भट्टचा जन्म १५ मार्च १९९३ रोजी मुंबईमध्ये भारतीय चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट आणि अभिनेत्री सोनी राजदान यांच्या भट्ट कुटुंबात झाला होता. तिचे वडील गुजराती वंशाचे आहेत आणि तिची आई काश्मिरी पंडित आणि जर्मन वंशाची आहे. तिच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे. तिला एक मोठी बहीण, शाहीन, पूजा भट्ट आणि राहुल भट्ट अशी दोन सावत्र भावंडे आहेत. अभिनेता इमरान हाश्मी आणि दिग्दर्शक मोहित सूरी हे तिचे माहेरचे चुलत भाऊ अथवा बहीण असून निर्माता मुकेश भट्ट तिचे काका आहेत. आलियाचे शिक्षण जमनाबाई नरसी शाळेत झाले.

चित्रपट कारकीर्द[संपादन]

वर्ष चित्रपट रोल हिरो
१९९९ संघर्ष रीत बालकलाकार
२०१२ स्टुडन्ट ऑफ द इयर शनाया वरुण धवन
२०१४ हायवे वीरा रणदीप हूडा
२०१४ टू स्टेट्स अनन्या अर्जुन कपुर
२०१५ शानदार आलिया शाहिद कपुर
२०१५ हम्पटी शर्मा की दुल्हनीया काव्या वरुण धवन
२०१६ कपूर ॲंन्ड सन्स टिया सिद्दार्थ मल्होत्रा
२०१६ उडता पंजाब बौरिया/मेरी शाहिद कपूर
२०१६ ऐ दिल है मुश्किल डीजे कोणीही नाही
२०१६ डियर जिंदगी कायरा शाहरुख खान
२०१७ बद्रीनाथ की दुल्हनिया वैदेही वरुण धवन
२०१८ राजी सहमत विकी कौशल
२०१९ गली बॉय सफिना रणवीर सिंग
२०१९ कलंक रुप वरुण धवन
२०१९ स्टुडंट ऑफ द इयर २ आलिया भट कोणीही नाही
२०२० सडक २ आर्या आदित्य रॉय कपूर

बाह्य दुवे[संपादन]