Jump to content

शशी कपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शशी कपूर
शशी कपूर
जन्म शशी कपूर
१८ मार्च १९३८
कलकत्ता, बंगाल, ब्रिटिश भारत
मृत्यू ४ डिसेंबर, २०१७ (वय ७९)
मुंबई
इतर नावे बलबीर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९४२ - १९९९
भाषा हिंदी भाषा
प्रमुख चित्रपट जब जब फूल खिले, प्यार का मौसम
पुरस्कार

 • पद्मभूषण (२०११),

 • दादासाहेब फाळके पुरस्कार (२०१५)
वडील पृथ्वीराज कपूर
पत्नी जेनिफर
अपत्ये कुणाल कपूर, करण कपूर, संजना कपूर

शशी कपूर तथा बलबीरराज कपूर (१८ मार्च, १९३८ - ४ डिसेंबर, २०१७) हे हिंदी चित्रपटसृष्टीतले एक अभिनेते आणि दिग्दर्शक होते. पृथ्वीराज कपूर यांचे वडील तर राज कपूर आणि ऋषी कपूर यांचे भाऊ होते.

शशी कपूर यांचे शिक्षण मुंबईत डॉन बॉस्को शाळेत झाले. त्यांनी १९४० पासून बालकलाकार म्हणून चित्रपटांत काम करायला सुरुवात केली. १९४०मध्ये शशीराज, १९४१मध्ये मीना आणि १९४५मध्ये बचपन या चित्रपटांत त्यांनी काम केले. त्यानंतर त्यांनी १९४८मधील आग आणि १९५१मधील आवारा चित्रपटांत भूमिका केल्या. १९४० ते १९५४ या काळात त्यांनी १९ चित्रपटांत बालकालाकार म्हणून काम केल्यानंतर १९६१मध्ये आलेल्या धर्मपुत्र या चित्रपटात त्यांना नायकाची भूमिका मिळाली. त्यांनी आयुष्यभरात सुमारे ११६ सिनेमांमध्ये काम केले, त्यांपैकी तब्बल ६१ सिनेमांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या.

२०११मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. २०१५मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याआधी त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर आणि बंधू राज कपूर यांनाही हा सन्मान मिळाला होता. चित्रपट सृष्टीतील हा महत्त्वाचा सन्मान मिळवणारे कपूर परिवारातील ते तिसरे सदस्य ठरले.

वैयक्तिक जीवन आणि कुटुंब

[संपादन]

कपूर यांनी ब्रिटिश अभिनेत्री जेनिफर केंडल यांच्याशी ३ जुलै १९५८ रोजी लग्न केले. जेनिफर यांचे वडील जेफ्री केंडल यांच्या शेक्सपिअरान या फिरत्या नाट्यमंडळीत काम करत असताना कपूर आणि जेनिफर यांची भेट झाली होती. जेनिफर यांनी बॉम्बे टॉकी आणि जूनून यांसारख्या चित्रपटांतून अभिनय केला. मुंबईतील पृथ्वी थिएटरच्या पुनर्उभारणीत आणि व्यवस्थापनात त्यांचा सिंहाचा वाटा होता. कपूर आणि केंडल यांना कुणाल, करण आणि संजना ही तीन मुले आहेत. कुणाल कपूर याने काही काळ अभिनय केल्यानंतर आर.के. स्टुडिओच्या जाहिरात क्षेत्रात काम केले. दुसरा मुलगा करण कपूर याने अभिनयासोबतच जागतिक स्तरावर एक नामवंत छायाचित्रकार म्हणून नाव कमावले. कन्या संजना कपूर यांनी अनेक वर्षे पृथ्वी थिएटरचे व्यवस्थापन केले. त्यानंतर त्या जुनून या संस्थेच्या माध्यमातून नाट्य चळवळ चालवत आहेत. ७ सप्टेंबर १९८४ रोजी कर्करोगामुळे जेनिफर यांचे निधन झाल्यावर त्याचा शशी कपूर यांच्या आयुष्यावर खोलवर परिणाम झाला होता.

पृुथ्वी थिएटर्सचे पुनरुज्जीवन

[संपादन]

बंद पडत चाललेल्या पृथ्वी थिएटर्सचे शशी कपूर यांनी पुनरुज्जीवन केले.

चित्रपट कारकिर्द

[संपादन]

चित्रपट

[संपादन]
चित्रपटवर्षसहकलाकारपुरस्कार आणि श्रेणीवैशिष्ट्य
आग१९४८राज कपूर--बालकलाकार
शशीराज१९४८----बालकलाकार
बचपन१९५०----बालकलाकार
संग्राम१९५०----बालकलाकार
आवारा१९५१राज कपूर--बालकलाकार (राज कपूर यांच्या बालपणीची भूमिका)
मीना१९५१----बालकलाकार
दानापानी१९५३----बालकलाकार
धर्मपुत्र१९६१माला सिन्हा--मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण
चार दीवारें१९६१नंदा--गंभीर सामाजिक विषय
वक्त१९६५शर्मिला टागोर--बहुतारांकित चित्रपट, व्यावसायिकरीत्या यशस्वी
जब जब फूल खिले१९६५नंदा--नायिका नंदा सोबतचा सुपरहिट चित्रपट
मोहब्बत इसको कहते है१९६५नंदा--रोमँटिक चित्रपट
नींद हमारी ख्वाब तुम्हारे१९६६नंदा--संगीत आणि अभिनयासाठी प्रसिद्ध
आमने सामने१९६७शर्मिला टागोर--थ्रिलर-रोमँटिक चित्रपट
हसीना मान जायेगी१९६८बबिता--दुहेरी भूमिका
कन्यादान१९६८आशा पारेख--कौटुंबिक चित्रपट
राजा साब१९६९नंदा--व्यावसायिक यश
प्यार का मौसम१९६९आशा पारेख--संगीतमय सुपरहिट
रुठाना करो१९७०नंदा--रोमँटिक चित्रपट
शर्मीली१९७१राखी--दुहेरी भूमिका असलेल्या नायिकेसोबतचा चित्रपट
आ गले लग जा१९७३शर्मिला टागोर--भावनिक संगीत चित्रपट
चोर मचाये शोर१९७४मुमताज--'ले जायेंगें ले जायेंगें' गाण्यासाठी प्रसिद्ध
रोटी कपडा और मकान१९७४अमिताभ बच्चन, झीनत अमान--सामाजिक-राजकीय विषय
दीवार१९७५अमिताभ बच्चनफिल्मफेर पुरस्कार: सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता [१]"मेरे पास माँ है" हा अजरामर संवाद
कभी कभी१९७६राखी, अमिताभ बच्चन--यशस्वी रोमँटिक चित्रपट
फकीरा१९७६शबाना आझमी--अ‍ॅक्शन आणि व्यावसायिक यश
चोर सिपाही१९७७परवीन बाबी--अ‍ॅक्शन चित्रपट
त्रिशूल१९७८अमिताभ बच्चन, हेमा मालिनी--ब्लॉकबस्टर यश
सत्यम् शिवम् सुंदरम्१९७८झीनत अमान--राज कपूर यांचे दिग्दर्शन
काला पत्थर१९७९अमिताभ बच्चन, राखी--कोळसा खाणीवर आधारित चित्रपट
सुहाग१९७९अमिताभ बच्चन, रेखा--१९७९ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
दो और दो पाँच१९८०अमिताभ बच्चन--विनोदी अ‍ॅक्शन चित्रपट
शान१९८०अमिताभ बच्चन, राखी--भव्य अ‍ॅक्शन चित्रपट
न्यू दिल्ली टाईम्स१९८६शर्मिला टागोरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार: सर्वोत्कृष्ट अभिनेता [२]शोध पत्रकारितेवर आधारित गंभीर भूमिका
हम तो चले परदेस१९८८----भावनिक चित्रपट
जिन्ना१९९८क्रिस्टोफर ली--लॉर्ड माउंटबॅटन यांची भूमिका

निर्माता

[संपादन]
* जुनून (१९७९)
* कलियुग (१९८१)
* ३६ चौरंगी लेन (१९८१)
* विजेता (१९८२)
* उत्सव (१९८४)
* अजूबा (१९९१)

सहाय्यक दिग्दर्शक

[संपादन]
* पोस्ट बॉक्स ९९९ (१९५८)
* गेस्ट हाऊस (१९५९)
* श्रीमान सत्यवादी (१९६०)
* दुल्हा दुल्हन (१९६४)
* मनोरंजन (१९७४)

दिग्दर्शक

[संपादन]
* वोझ्व्रश्शेनिया बगदादस्कोगो वोरा (Vozvrashcheniye Bagdadskogo Vora) (१९८८)
* अजूबा (१९९१)

आंतरराष्ट्रीय चित्रपट (ब्रिटिश, अमेरिकन आणि इंडो-इंग्लिश)

[संपादन]
चित्रपटवर्षसहकलाकारवैशिष्ट्य
द हाऊसहोल्डर१९६३लीला नायडूमर्चंट आयव्हरी प्रॉडक्शनचा पहिला चित्रपट
शेक्सपिअरवाला१९६५मधुर जाफरीजगभर गाजलेला इंह्विळ चित्रपट
प्रिटी पॉली१९६७हेले मिल्समूळ नाव: अ मॅटर ऑफ इनोसन्स
बॉम्बे टॉकी१९७०जेनिफर केंडलस्वतःच्या पत्नीसोबत काम
सिद्धार्थ१९७२सिमी गरेवालहरमन हेस यांच्या कादंबरीवर आधारित
हीट अँड डस्ट१९८३ग्रेटा स्कॅचीबुकर पुरस्कार विजेत्या कादंबरीवर आधारित
सॅमी अँड रोझी गेट लेड१९८७फ्रान्सेस बार्बरब्रिटीश चित्रपट
द डिसीव्हर्स१९८८पियर्स ब्रॉस्ननऐतिहासिक थ्रिलर
साईड स्ट्रीट१९९८----
इन कस्टडी (मुहाफीज)१९९३ओम पुरीअनिता देसाई यांच्या कादंबरीवर आधारित

पुरस्कार

[संपादन]

नागरी सन्मान

[संपादन]
मे २०१५ मध्ये केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्याकडून दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारताना शशी कपूर. सोबत मुलगा कुणाल कपूर आणि मुलगी संजना कपूर

विजेता

फिल्मफेअर पुरस्कार

[संपादन]

बंगाल फिल्म जर्नलिस्ट्स असोसिएशन - सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार (हिंदी)

[संपादन]
  • १९६५ - जब जब फूल खिले[४]
  • १९८८ - न्यू दिल्ली टाइम्स[५]

इतर पुरस्कार

[संपादन]
  • २०११ – मोहम्मद रफी पुरस्कार[६]
  • जीवनगौरव पुरस्कार

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ↑ "Filmfare Awards Winners". Filmfare. १५ मार्च २०२६ रोजी पाहिले.
  2. ↑ "National Film Awards Archives". Directorate of Film Festivals. १५ मार्च २०२६ रोजी पाहिले.
  3. ↑ "Shashi Kapoor chosen for the prestigious Dada Saheb Phalke Award". IBNLive. 24 March 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 March 2015 रोजी पाहिले.
  4. ↑ "69th & 70th Annual Hero Honda BFJA Awards 2007". Bfjaawards.com. 8 January 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 July 2010 रोजी पाहिले.
  5. ↑ "69th & 70th Annual Hero Honda BFJA Awards 2007". Bfjaawards.com. 2010-01-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 July 2012 रोजी पाहिले.
  6. ↑ "2011 Mohammed Rafi Awards". The Indian Express. India. 15 April 2011.
  7. ↑ "Evénements récurrents | Africultures : Festival International de film du Caire". Africultures (फ्रेंच भाषेत). 2025-10-06 रोजी पाहिले.
  8. ↑ "Hema Malini, Shashi Kapoor honored". Ibosnetwork.com. 9 January 2009. 30 June 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 July 2010 रोजी पाहिले.
  9. ↑ "Lifetime Achievement award at Mumbai Film Festival". Bollywood Hungama. 29 August 2009. 23 November 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित.