पूर्व द्रुतगती महामार्ग
Appearance
पूर्व मुक्त मार्ग याच्याशी गल्लत करू नका.
पूर्व द्रुतगती मार्ग | |
---|---|
मार्ग वर्णन | |
देश | भारत |
लांबी | २३.५५ किलोमीटर (१४.६३ मैल) |
सुरुवात | ठाणे |
प्रमुख जोडरस्ते | घोडबंदर रोड, जोगेश्वरी–विक्रोळी जोडरस्ता, शीव पनवेल महामार्ग, सांताक्रुझ–चेंबूर जोडरस्ता, पूर्व मुक्त मार्ग |
शेवट | छत्रपती शिवाजी टर्मिनस, दक्षिण मुंबई |
स्थान | |
शहरे | मुंबई, ठाणे |
राज्ये | महाराष्ट्र |
पूर्व द्रुतगती महामार्ग (Eastern Express Highway) हा राष्ट्रीय महामार्ग ३चा मुंबई महानगर क्षेत्रामधील भाग व मुंबई शहरामधील पूर्व उपनगरांमधून धावणारा एक महत्त्वाचा रस्ता आहे. २३.५५ किमी लांबीचा हा दृतगतीमार्ग उत्तर-दक्षिण धावतो व ठाणे शहराला मुंबईसोबत जोडतो. हा महामार्ग मुंबईच्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर, शीव, दादर इत्यादी अनेक महत्त्वाच्या उपनगरांना जोडतो. अत्यंत वर्दळीच्या ह्या मार्गावर वाहतूक सुधारण्यासाठी अनेक उड्डाणपूल बांधले गेले आहेत.