चर्चा:घोडबंदर रस्ता
Appearance
ही माहिती चुकीची आहे. घोडबंदर रोडची सुरुवात माहीमच्या खाडीवरील पुलापासून होते आणि शेवट घोडबंदरच्या किल्ल्यापाशी होतो. या रस्त्याचे नाव बदलून स्वामी विवेकानंद रोड असे केले असले तरी तो अजूनही घोडबंदर रोड याच नावाने ओळखला जातो. घोडबंदर किल्ल्याच्या जवळ एक घोड्यांची आयात-निर्यात करणारे बंदर होते....J (चर्चा) १४:३८, १० सप्टेंबर २०१४ (IST)
- >>घोडबंदर किल्ल्याच्या जवळ एक घोड्यांची आयात-निर्यात करणारे बंदर होते.... <<
- प्रथमदर्शनी या व्युत्पत्तीला भक्कम आधार/संदर्भाची गरज वाटते. मराठीत घोड हा शब्द थोराड/थोरला या अर्थानेही वापरला जातो. भारत मुख्यत्वे घोडे आयात करणारा देश होता आणि पाच पन्नास घोड्यांच्या आयातीसाठी विशेष बंदराची गरज समजून येत नाही सध्यातरी तर्क पडताळण्याची गरज वाटते, घोड्यांच्या निर्यातीसाठी म्हणून पोर्तूगिजांनी विशेष बंदर उभारले असेल तर एक तशी शक्यता असू शकेल पण त्यासाठी भक्काम संदर्भ हवा असे वाटते. (चुभूदेघे)
- बखर म्हणून मर्यादा लक्षात घेऊनही महिकावतीच्या बखरी बद्दलचा येथील उल्लेख बरोबर असेल तर घोडबंदरची स्थापना १२व्या शतकापर्यंत मागे जाते. या महिकावतीच्या बखर उल्लेखात घेड नावाच्या जमातीचाही उल्लेख येतो. घेड नावही घेडचे घोड झाले नसेल हे ही या क्षणी नेमके पणाने सांगता येत नाही.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:०३, १० सप्टेंबर २०१४ (IST)
- जे, मी स्वत: घोडबंदर रोडवरून अनेक वेळा प्रवास केला आहे. सध्या हा ठाण्यामधील सर्वात मोठा रस्ता आहे. आपण म्हणता तो कोणता तरी वेगळा रस्ता असेल. - अभिजीत साठे (चर्चा) १७:५३, १० सप्टेंबर २०१४ (IST)