आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ (एएएनए) ही उत्तर अमेरिकेतील सामाजिक व शैक्षणिक संस्था आहे. एएएनए ची स्थापना सन २००८ मध्ये करण्यात आली. ही एक नोंदणीकृत नॉन-प्रॉफिट, चॅरिटेबल आणि सांस्कृतिक संस्था आहे. ऑनलाइन कारकीर्द मार्गदर्शन, महिला सक्षमीकरण, शिक्षणासाठी मदत इत्‍यादी उपक्रम या संस्‍थेतर्फे अमेरिका व भारतामध्‍ये राबवले जातात.[१] मानखुर्द, नवी मुंबई येथील बालकल्‍याण नगरी या बाल आश्रमास संस्‍थेने मोफत कॉम्‍प्‍युटर लॅब दिली आहे. दलितांवरील अत्‍याचाराची नोंद घेण्‍यासाठी या संस्‍थेतर्फे संयुक्‍त राष्‍ट्र संघाला १० लाख स्‍वाक्षऱ्यांचे निवेदन देण्‍यात आले आहे.

ध्येय[संपादन]

गरीबांच्या आयुष्याचे उत्थान करण्याचे उद्दिष्ट या संस्थेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न व ध्येय तसेच भारतातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील गरीबांच्या उन्नतीसाठीच्या दृष्टिकोनावर ही संस्था विश्वास ठेवते. संस्था शिक्षण, आंदोलन आणि संघटित करून डॉ. आंबेडकरांचा वारसा प्रसारित करण्यावर भर देते. तसेच बुद्धांचा मानवजातीतील शांती आणि दयाळूपणाचा संदेश प्रसारित करण्याचे काम करते. गरिबांचे जीवन शिक्षणाच्या माध्यमातून बदलून त्यांना गरिबीतून बाहेर पाडून, त्यांच्या समाजात आवाज प्राप्त करण्यास आणि चांगल्या दर्जाची जीवनशैली प्रदान करण्याचे काम ही संस्था करते.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]