अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादी
Appearance
(अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची यादी या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे इ.स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे पहिले अध्यक्ष होते.
अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंत महामंडळाने 96 साहित्य संमेलने घेतली असून घुमान येथे झालेले साहित्य संमेलन हे 88 वे साहित्य संमेलन होते. महामंडळ अस्तित्वात येण्यापूर्वी कुसुमावती देशपांडे या एकच स्त्री अध्यक्ष झालेल्या होत्या. महामंडळाच्या स्थापनेनंतर दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष, अरुणा ढेरे या चार स्त्रिया संमेलनाध्यक्ष झाल्या आहेत.
मराठी साहित्य संमेलनांच्या दहा गाजलेल्या संमेलनाध्यक्षांवर आधारित ’साहित्य दरबारातील दशरत्ने’ नावाचे पुस्तक प्राचार्य श्याम भुर्के यांनी लिहिले आहे.
माजी संमेलनाध्यक्षांचा परिचय करून देणारी किमान चार पुस्तके आहेत, त्यांपैकी ही काही :
- अरुणा ढेरे व्यक्ती आणि कथनात्मक लेखन (नानासाहेब यादव)
- दभि सहवास आणि सन्मान (डॉ. श्यामला मुजुमदार)
- संमेलनाध्यक्ष प्रा. रा. ग. जाधव (संपादक - अरुण पारगावकर)
- ’साहित्य दरबारातील दशरत्ने’ (प्राचार्य श्याम भुर्के)