कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर (नोव्हेंबर २३, १८७२ - ऑगस्ट २७, १९४८) हे ख्यातनाम मराठी नाटककार, पत्रकार होते.

महत्त्वाच्या घटना[संपादन]

 • १८९२ : तत्त्वज्ञान हा विषय घेऊन बी.ए. ची परीक्षा उत्तीर्ण.
 • १८९२–९४ : सांगली हायस्कूल मध्ये शिक्षक होते. त्यानंतर मुंबईस कायद्याचा अभ्यास करून एल्एल्.बी.
 • १८९३: लेखनाला प्रारंभ केला. "सवाई माधवराव यांचा मृत्यु" या पहिल्या नाटकाचे लेखन ह्याच वर्षी झाले.
 • १८९५ : "विविधज्ञान विस्तार" मध्ये लिखाण प्रसिद्ध झाले.
 • १८९६ : विविधज्ञान विस्तारात प्रसिद्ध झालेल्या, महादेव शिवराम गोळे ह्यांच्या ब्राह्मण आणि त्यांची विद्या (१८९५) ह्या ग्रंथावरील परीक्षणामुळे लोकमान्य टिळकांशी परिचय झाला व त्यातून त्यांचा पुढे केसरीशी संबंध आला.
 • १८९६ : त्यांनी केसरीत ‘राष्ट्रीय महोत्सव हा लेख लिहिला.
 • १८९७ : केसरीत दाखल. लोकमान्यांच्या स्वराज्यवादी जहाल भूमिकेशी तन्मय होऊन त्यांनी केसरीत काम केले. आपल्या प्रखर राजकीय विचारांच्या समर्थनार्थ नाट्यलेखनाचाही आश्रय घेतला.
 • १९०१ : ‘गनिमी काव्याचे युद्ध’ ही लेखमाला लिहिली.
 • १९०२ : कौलांच्या कारखान्याचे निमित्त करून ते नेपाळ मध्ये गेले आणि
 • १९०५ : परत केसरीत दाखल झाले.
 • १९०७ : तिसऱ्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले.
 • १९०८ -१०: टिळकांच्या तुरुंगवासाच्या काळात ते केसरीचे संपादक होते.
 • १९१० : केसरीचे संपादकत्व त्यांनी सोडले.
 • १९१३ : बाल्कन युद्धावरील लेखमाला लिहिली.
 • १९१४ : चित्रमयजगत् मध्ये पहिल्या महायुद्धावरील लेखमालेस प्रारंभ केला.
 • १९१८ : लोकमान्य टिळक व न. चिं. केळकर हे विलायतेला गेल्यामुळे केसरीचे संपादकत्व त्यांनी स्वीकारले.
 • १९२० : लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर त्यांचा केसरीशी संबंध सुटला. टिळकांनंतर खाडिलकर हे टिळक संप्रदायापासून वेगळे होऊन गांधींच्या राजकारणाचे समर्थक बनले.
 • १९२१ पासून मुंबईस लोकमान्य दैनिकाचे संपादन केले.
 • १९२१ : गांधर्व महाविद्यालयातर्फे भरलेल्या संगीत परिषदेचे ते अध्यक्ष होते.
 • १९२३ : त्यांनी लोकमान्य दैनिकाचे संपादकत्व सोडले. त्याच साली स्वतःच्या मालकीच्या नवाकाळ ह्या दैनिकाचे ते संपादक झाले.
 • १९२५ : आठवड्याचा नवाकाळ सुरू केला.
 • १९२७ : हिंदुमुसलमानांच्या वादावरील लेखाबद्दल नवाकाळवर खटला होऊन खाडिलकरांना दंडाची शिक्षा झाली.
 • १९२९ : राजद्रोहाचा खटला झाला व एक वर्षाची शिक्षा झाली.
 • १९३३ : नागपूर येथे अठराव्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
 • १९३३–३५ : सांगलीस दत्तमंदिरात योगविषयक प्रवचने देत.
 • १९३५–४७ : अध्यात्म-ग्रंथमालेतील पुस्तकांचे लेखन केले.
 • १९४३ : सांगली येथे झालेल्या मराठी रंगभूमीच्या शतसांवत्सरिक उत्सवास खाडिलकरांनी संदेश पाठविला होता.
 • कर्झनशाहीचे खरे स्वरूप प्रगट करू पाहणाऱ्या त्यांच्या कीचकवध नाटकाच्या प्रयोगावर १९१० साली इंग्रज सरकारने बंदी घातली आणि ते जप्त केले.
 • १९४८ : निधन

पत्रकारिता[संपादन]

प्रकाशित साहित्य[संपादन]

नाटके[संपादन]

(पंधरा नाटके)

महत्त्वाच्या लेखांचा व भाषणांचा संग्रह[संपादन]

 • खाडिलकरांचा लेखसंग्रह (भाग १ व २, १९४९)

अध्यात्मपर लेखन[संपादन]

 • ऐतरेय आणि ईशावास्योपनिषद
 • ॐकाराची उपासना
 • तैत्तिरीयोपनिषद
 • त्रिसूपर्णाची शिकवणूक
 • याज्ञवल्क्यमैत्रेयीसंवाद
 • रुद्र, संध्यावंदन व पुरुषसूक्त