Jump to content

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे इ.स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे पहिले अध्यक्ष होते.

अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंत महामंडळाने 96 साहित्य संमेलने घेतली असून घुमान येथे झालेले साहित्य संमेलन हे 88 वे साहित्य संमेलन होते. महामंडळ अस्तित्वात येण्यापूर्वी कुसुमावती देशपांडे या एकच स्त्री अध्यक्ष झालेल्या होत्या. महामंडळाच्या स्थापनेनंतर दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष, अरुणा ढेरे या चार स्त्रिया संमेलनाध्यक्ष झाल्या आहेत.

मराठी साहित्य संमेलनांच्या दहा गाजलेल्या संमेलनाध्यक्षांवर आधारित ’साहित्य दरबारातील दशरत्‍ने’ नावाचे पुस्तक प्राचार्य श्याम भुर्के यांनी लिहिले आहे.

माजी संमेलनाध्यक्षांचा परिचय करून देणारी किमान चार पुस्तके आहेत, त्यांपैकी ही काही :

  1. अरुणा ढेरे व्यक्ती आणि कथनात्मक लेखन (नानासाहेब यादव)
  2. दभि सहवास आणि सन्मान (डॉ. श्यामला मुजुमदार)
  3. संमेलनाध्यक्ष प्रा. रा. ग. जाधव (संपादक - अरुण पारगावकर)
  4. ’साहित्य दरबारातील दशरत्‍ने’ (प्राचार्य श्याम भुर्के)

साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांची यादी []

[संपादन]
संमेलन क्र. वर्ष स्थळ अध्यक्ष
१८७८ पुणे न्या. महादेव गोविंद रानडे
१८८५ पुणे कृष्णशास्त्री राजवाडे
१९०५ सातारा रघुनाथ पांडुरंग करंदीकर
१९०६ पुणे वासुदेव गोविंद कानिटकर
१९०७ पुणे विष्णू मोरेश्वर महाजनी
१९०८ पुणे चिंतामण विनायक वैद्य
१९०९ बडोदे कान्होबा रामछोडदास कीर्तिकर
१९१२ अकोला हरी नारायण आपटे
१९१५ मुंबई गंगाधर पटवर्धन
१० १९१७ इंदूर गणेश जनार्दन आगाशे
११ १९२१ बडोदे नरसिंह चिंतामण केळकर
१२ १९२६ मुंबई माधव विनायक किबे
१३ १९२७ पुणे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
१४ १९२८ ग्वाल्हेर माधव श्रीहरी अणे
१५ १९२९ बेळगांव शिवराम महादेव परांजपे
१६ १९३० मडगांव वामन मल्हार जोशी
१७ १९३१ हैदराबाद श्रीधर व्यंकटेश केतकर
१८ १९३२ कोल्हापूर महाराजा सयाजीराव गायकवाड
१९ १९३३ नागपूर कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
२० १९३४ बडोदे नारायण गोविंद चापेकर
२१ १९३५ इंदूर भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी
२२ १९३६ जळगाव माधव जुलियन/माधव त्रिंबक पटवर्धन
२३ १९३८ मुंबई विनायक दामोदर सावरकर
२४ १९३९ अहमदनगर दत्तो वामन पोतदार
२५ १९४० रत्‍नागिरी नारायण सीताराम फडके
२६ १९४१ सोलापूर विष्णू सखाराम खांडेकर
२७ १९४२ नाशिक प्रल्हाद केशव अत्रे
२८ १९४३ सांगली श्रीपाद महादेव माटे
२९ १९४४ धुळे भार्गवराम विठ्ठल वरेरकर
३० १९४६ बेळगांव गजानन त्र्यंबक माडखोलकर
३१ १९४७ हैदराबाद नरहर रघुनाथ फाटक
३२ १९४९ पुणे शंकर दत्तात्रय जावडेकर
३३ १९५० मुंबई यशवंत दिनकर पेंढारकर/कवी यशवंत
३४ १९५१ कारवार अनंत काकबा प्रियोळकर
३५ १९५२ अमळनेर कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी
३६ १९५३ अहमदाबाद वि.द. घाटे
३७ १९५४ दिल्ली लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी
३८ १९५५ पंढरपूर शंकर दामोदर पेंडसे
३९ १९५७ औरंगाबाद अनंत काणेकर
४० १९५८ मालवण अनिल/ आत्माराम रावजी देशपांडे
४१ १९५९ मिरज श्रीकृष्ण केशव क्षीरसागर
४२ १९६० ठाणे रामचंद्र श्रीपाद जोग
४३ १९६१ ग्वाल्हेर कुसुमावती देशपांडे
४४ १९६२ सातारा नरहर विष्णू गाडगीळ
४५ १९६४ मडगाव वि.वा.शिरवाडकर/ कुसुमाग्रज
४६ १९६५ सातारा वामन लक्ष्मण कुलकर्णी
४७ १९६७ भोपाळ विष्णू भिकाजी कोलते
४८ १९६९ वर्धा पु.शि.रेगे
४९ १९७३ यवतमाळ गजानन दिगंबर माडगूळकर
५० १९७४ इचलकरंजी पु.ल.देशपांडे
५१ १९७५ कऱ्हाड दुर्गा भागवत
५२ १९७७ पुणे पु.भा.भावे
५३ १९७९ चंद्रपूर वामन कृष्ण चोरघडे
५४ १९८० बार्शी गं.बा.सरदार
५५ १९८१ अकोला गो.नी.दांडेकर
५६ १९८१ रायपूर (छत्‍तीसगढ) गंगाधर गाडगीळ
५७ १९८३ अंबेजोगाई व्यंकटेश दिगंबर माडगूळकर
५८ १९८४ जळगांव शंकर रामचंद्र खरात
५९ १९८५ नांदेड शंकर बाबाजी पाटील
६० १९८८ मुंबई विश्राम बेडेकर
६१ १९८८ ठाणे वसंत कानेटकर
६२ १९८९ अमरावती केशव जगन्नाथ पुरोहित
६३ १९९० पुणे यू.म. पठाण
६४ १९९० रत्‍नागिरी मधू मंगेश कर्णिक
६५ १९९२ कोल्हापूर रमेश मंत्री
६६ १९९३ सातारा विद्याधर गोखले
६७ १९९४ पणजी राम शेवाळकर
६८ १९९५ परभणी नारायण सुर्वे
६९ १९९६ आळंदी शांता शेळके
७० १९९७ अहमदनगर ना.सं.इनामदार
७१ १९९८ परळी-वैजनाथ द.मा.मिरासदार
७२ १९९९ मुंबई वसंत बापट
७३ २००० बेळगांव य.दि.फडके
७४ २००१ इंदूर विजया राजाध्यक्ष
७५ २००२ पुणे राजेंद्र बनहट्टी
७६ २००३ कऱ्हाड सुभाष भेंडे
७७ २००४ औरंगाबाद रा.ग. जाधव
७८ २००५ नाशिक केशव मेश्राम
७९ २००६ सोलापूर मारुती चितमपल्ली
८० २००७ नागपूर अरुण साधू
८१ जानेवारी २००८ सांगली म.द. हातकणंगलेकर
८२ फेब्रुवारी २००९ महाबळेश्वर आनंद यादव
८३ २०१० पुणे द.भि.कुलकर्णी
८४ २०१० ठाणे उत्तम कांबळे
८५ २०१२ चंद्रपूर वसंत आबाजी डहाके
८६ २०१३ चिपळूण नागनाथ कोत्तापल्ले
८७ २०१४ सासवड फ. मुं. शिंदे
८८ २०१५ घुमान (पंजाब) सदानंद मोरे
८९ २०१६ पिंपरी-चिंचवड (पुणे) श्रीपाल सबनीस
९० २०१७ डोंबिवली अक्षयकुमार काळे
९१ २०१८ बडोदे लक्ष्मीकांत देशमुख
९२ २०१९ यवतमाळ अरुणा ढेरे
९३ १०, ११, १२ जानेवारी २०२० उस्मानाबाद फादर फ्रान्सिस दिब्रिटो
९४ २६, २७, २८ मार्च २०२१ नाशिक जयंत नारळीकर
९५ २२, २३, २४ एप्रिल २०२२ उदगीर भारत सासणे
९६ फेब्रुवारी २०२३ वर्धा नरेंद्र चपळगावकर

संदर्भ

[संपादन]
  1. ^ [१][permanent dead link]