Jump to content

देवगड तालुुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(देवगड तालुका या पानावरून पुनर्निर्देशित)


हापूस आंबा
विजयदुर्ग किल्ल्याचे बुरुज
Photo of 10 large mangoes
हापूस आंबे (स्थानिक नाव: हापूस ) प्रामुख्याने महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग आणि रत्‍नागिरी जिल्ह्यांत पिकतात. . []

देवगड हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक तालुका आहे. तालुक्यात ९८ गावे आहेत. तालुक्याचे मुख्यालय देवगड हे गाव अरबी समुद्रातील महाराष्ट्र राज्याच्या कोकण किनारपट्टीवर मुंबईच्या दक्षिणेस वसले आहे. देवगडला समुद्रकिनारा, एक छोटे बंदर आहे. समुद्र किनाऱ्यावरच्या देवगड किल्ल्यावर सन १९१५ साली बांधलेले एक दीपगृह आहे.

देवगड तालुक्यातील दुसरा किल्ला विजयदुर्ग (घेरिया) हा शिलाहार राजघराण्यातील राजा भोज द्वितीय याने बांधला, त्यानंतर आदिलशाह, शिवाजी महाराज व शेवटी कान्होजी आंग्रे यांनी त्यावर राज्य केले. ब्रिटिश राज्यकर्ते, डच, पोर्तुगीज हे या किल्ल्याला त्याच्या अभेद्यपणासाठी "पूर्वेकडचे जिब्राल्टर" म्हणत.

देवगड गावाच्या सर्वात जवळचे रेल्वे स्थानक हे मुंबई - गोवा महामार्गावरील कोकण रेल्वेवरील कणकवली आहे. कणकवली येथून देवगड-विजयदुर्गला जाण्यासाठी ऑटो-रिक्षा किंवा राज्य परिवहन बसेस मिळू शकतात. विजयदुर्गाच्या समुद्राखाली एक तटबंदी भिंत आहे. तिच्यावर शत्रूची जहाजे किल्ल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्नात आपटत आणि बुडत.. []

तालुक्यातील गावे

[संपादन]
  1. आडबंदर
  2. आरे(देवगड)
  3. बागमाळा
  4. बागतळवडे
  5. बांदेगाव
  6. बापर्डे
  7. बुरंबावडे
  8. चाफेड
  9. चांदोशी
  10. चिंचवड(देवगड)
  11. दाभोळे
  12. दहीबाव
  13. देवगड
  14. धालावली
  15. धोपटेवाडी
  16. इळये
  17. गढीताम्हाणे
  18. गवाणे(देवगड)
  19. गिर्ये
  20. गोवळ(देवगड)
  21. हडपिड
  22. हिंदळे
  23. हुर्शी
  24. जामसंडे
  25. जुवेश्वर
  26. कळंबई
  27. काळवी
  28. कसबा वाघोटण
  29. कातवण
  30. कातवणेश्वर
  31. खुडी
  32. किंजवडे
  33. कोर्ले(देवगड)
  34. कोटकामते
  35. कुणकावण
  36. कुणकेश्वर
  37. कुवळे
  38. लिंगडाळ
  39. महाळुंगे(देवगड)
  40. मालेगाव(देवगड)
  41. मालपेवाडी
  42. मणचे
  43. मिठबाव
  44. मिठमुंबरी
  45. मोहुळगाव
  46. मोंड
  47. मोंडपार
  48. मोरवे
  49. मौजे वाघोटण
  50. मुणगे
  51. मुटाट
  52. नाड
  53. नाडण
  54. नारिंग्रे
  55. निमतवाडी
  56. ओंबळ
  57. पडेल
  58. पाटथर
  59. पडवणे
  60. पालेकरवाडी
  61. पाटगाव
  62. पवणाई
  63. पेंढारी
  64. फणसे
  65. फणसगाव
  66. पोंभुर्ले
  67. पोयरे
  68. पुरळ
  69. रहातेश्वर
  70. रामेश्वर
  71. रेंबावळी
  72. साळशी
  73. सांडवे
  74. सौंदाळे
  75. शेरीघेरा कामटे
  76. शेवरे
  77. शिरवली
  78. शिरगाव
  79. सोमळेवाडी
  80. तळवडे
  81. तळेबाजार
  82. तांबळडेग
  83. टेंबवली
  84. ठाकुरवाडी
  85. तिर्लोट
  86. तोरसोळ
  87. उंडील
  88. वालीवंडे
  89. विजयदुर्ग
  90. विरवाडी(देवगड)
  91. विठ्ठलादेवी
  92. वाडकेरपोई
  93. वाडे(देवगड)
  94. वाडेतर
  95. वाघिवरे(देवगड)
  96. वानिवडे
  97. वरेरी
  98. वेळगाव((देवगड)


संदर्भ .https://villageinfo.in/

देवगडचा आंबा

[संपादन]

देवगड तालुका स्थानिक पातळीवर पिकविल्या जाणाऱ्या हापूस आंब्याच्या निर्यातीसाठी जागतिक स्तरावर ओळखला जातो. [] देवगड तालुक्यातील शुद्ध हापूस आंब्याच्या लागवडीमुळे संपूर्ण तालुक्याचा विकास झाला आहे. येथे पिकलेला आंबा हा त्याचा सुगंध, गुळगुळीत पातळ त्वचा आणि दाट केशरी गर यांसाठी प्रसिद्ध आहे. रत्‍नागिरी जिल्ह्यात अन्यत्र पिकविल्या जाणाऱ्या हापूस आंब्यापेक्षा हा प्रकार वेगळा आहे. देवगड हापूस आंब्याची अशी लोकप्रियता आहे की, विक्रेते बहुतेकदा असेच दिसणारे आंबे देवगड हापूसच्या नावाखाली पाठवून ग्राहकांची फसवणूक करतात.

देवगड येथील हापूस आंबा हा ४५,००० एकर क्षेत्रावर पिकविला जातो आणि वर्षभरात याचे चांगल्या वातावरणात उत्पादनामध्ये सुमारे ५०,००० टन उत्पादन होते. देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था लिमिटेड नावाच्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांची भारतील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी सहकारी संस्था आहे. यात ७०० सदस्य असून, २०१३ साली या संस्थेस २५ वर्ष पूर्ण झाली.

अन्य माहिती

[संपादन]

देवगडजवळच्या समुद्रामध्ये तसेच तालुक्‍यातील खाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी होते. या प्रदेशाचा मुख्य आहार म्हणजे तांदूळ आणि मासे.

देवगड तालुक्यातील गिर्ये येथे महाराष्ट्राचा पहिला सरकारी पवनचक्की प्रकल्प आहे.

देवगड शहरापासून १६ किमी अंतरावर ११व्या शतकातील कुणकेश्वर गावात हिंदू देवता शिवाचे एक प्राचीन मंदिर आहे. महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्रभरातून लोक येथे एकत्र येतात. पवनचक्कीपासून ३ किमी अंतरावर एक १६व्या शतकातील श्री देव रामेश्वर मंदिर महादेवाला समर्पित आहे . मुणगे गावात देवी भगवती देवीचे मंदिर आहे. हिंदळे गावात विश्वेश्वराया आणि स्वामी कार्तिकस्वामी या देवतांची मंदिरे आहेत. तसेच गढीताम्हाणे गावात श्री रहाटेश्वरांचे मंदिर आहे. जामसांडे म्हणून ओळखले जाणारे एक छोटेसे गाव देवगडजवळ आहे. जामसांडे येथे दिर्बा देवीचे मंदिर आहे. हे अंदाजे देवगड बसस्थानकापासून ४ कि.मी. अंतरावर आहे. ज्या पर्यटकांना गोव्याचे किनारे टाळायचे आहेत त्यांच्यासाठी देवगड हळूहळू पर्यटन आकर्षण केंद्र बनत आहे. शांतपूर्ण आणि नीरव पार्श्वभूमीवर हे थिकाण कौटुंबिक सहलीसाठी योग्य आहे.

भारताची पश्चिम किनारपट्टी ही अत्यंत संवेदनशील आहे, म्हणूनच अलीकडेच भारत सरकारने देवगड दीपगृहाजवळ रडार आणि इलेक्ट्रो-ऑप्टिक सेन्सर बसवले आहे. २५ नॉटिकल मैलांपर्यंतच्या रिअल-टाईम पाळत ठेवण्याच्या कल्पनेसाठी निवडलेल्या ४६ पैकी देवगड हे एक स्थान आहे.

२०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार खेड्यांची व त्यांच्या लोकसंख्येची यादी खाली दिली आहे:

# गाव तालुका जनसंख्या
आडबंदर देवगड २९२
आरे देवगड १३३५
बागमळा देवगड ३०३
बागतळवडे देवगड १३६
बंदेगाव देवगड २२२
बापर्डे देवगड १३०४
Burabavade देवगड
8 Chafed देवगड 629
9 चांदोशी देवगड 697
10 चिंचवड देवगड 280
11 दाभोळे देवगड 2,356
12 दहीबांव देवगड 1,517
13 देवगड देवगड 2,417
14 Dhalavali देवगड 1,230
15 Dhoptewadi देवगड 796
16 इळये देवगड 1,697
17 गढीताम्हणे देवगड 648
18 Gavane देवगड 693
19 गिरये देवगड 2,457
20 Goval देवगड 1,039
21 हडपिड देवगड 522
22 हिंदळे देवगड 1,714
23 Hurshi देवगड 1,206
24 जामसंडे देवगड 14,487
25 Juveshwar देवगड 1,057
26 Kalambai देवगड 1,066
27 Kalvi देवगड 604
28 कसबा वाघोटन देवगड 313
29 कातवण देवगड 794
30 कातवणेश्वर देवगड 829
31 खुडी देवगड 1,527
32 किंजवडे देवगड 2,491
33 Korle देवगड 681
34 कोटकामते देवगड 1,808
35 Kunkawan देवगड 896
36 कुणकेश्वर देवगड 1,829
37 Kuvale देवगड 1,255
38 लिंगडाळ देवगड 491
39 Mahalunge देवगड 1,054
40 Malegaon देवगड 1,025
41 Malpewadi देवगड 632
42 मणचे देवगड 2,261
43 मिठबांव देवगड 2,241
44 मिठमुंबरी देवगड 920
45 Mohulgaon देवगड 715
46 मोंड देवगड 1,564
47 Mondpar देवगड 907
48 मोर्वे देवगड 408
49 मौजे वाघोटन देवगड 1,380
50 मुणगे देवगड 1,883
51 Mutat देवगड 1,933
52 Nad देवगड 990
53 Nadan देवगड 2,105
54 नारिंग्रे देवगड 1,516
55 Nimatwadi देवगड 629
56 Ombal देवगड 527
57 पडेल देवगड 3,673
58 Padthar देवगड 1,074
59 Padvane देवगड 660
60 Palekarwadi देवगड 1,210
61 Patgaon देवगड 942
62 Pavnai देवगड 732
63 Pendhari देवगड 1,053
64 फणसे देवगड 738
65 फणसगाव देवगड 1,328
66 Pombhurle देवगड 1,910
67 पोयरे देवगड 943
68 Pural देवगड 1,203
69 Rahateshwar देवगड 628
70 रामेश्वर देवगड 2,099
71 Rembavali देवगड 259
72 Salashi देवगड 1,164
73 Sandve देवगड 473
74 सौंदाळे देवगड 1,939
75 Sherighera Kamte देवगड 4
76 Shevare देवगड 368
77 शिरवली देवगड 478
78 शिरगाव देवगड 2,555
79 Somlewadi देवगड 602
80 तळवडे देवगड 1,163
81 तळेबाजार देवगड 689
82 तांबळडेग देवगड 731
83 टेंबवली देवगड 829
84 Thakurwadi देवगड 1,033
85 तिर्लोट देवगड 2,307
86 Torsole देवगड 1,172
87 Undil देवगड 623
88 वळिवंडे देवगड 962
89 विजयदुर्ग देवगड 1,735
90 विरवाडी देवगड 391
91 Vitthaladevi देवगड 668
92 Wadaker Poi देवगड 178
93 वाडे देवगड 1,728
94 वाडेतर देवगड 293
95 Waghivare देवगड 381
96 वानिवडे देवगड 811
97 वरेरी देवगड 1,869
98 Welgave देवगड 400

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/