Jump to content

महाविकास आघाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाविकास आघाडी ही २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली राज्यस्तरीय राजकीय आघाडी आहे. महाविकास आघाडी मध्ये काॅंग्रेस, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष व काही अपक्ष आमदार सुद्धा आहेत. २६ नोव्हेंबर २०१९ रोजी झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.[] महाविकास आघाडी मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस हे तीन प्रमुख पक्ष आहेत.

पार्श्वभुमी

[संपादन]

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप व शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून व खाते वाटपावरून निर्माण झालेल्या वादानंतर शिवसेनेने भाजप सोबत असलेली २५ वर्षाची युती तोडली. युती तुटल्यानंतर मोदी मंत्रीमंडळात केंद्रीय मंत्री असलेले शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीही मंत्री पदाचा राजीनामा दिला.[] शिवसेनेसोबतची युती तुटल्यानंतर २३ नोव्हेंबर २०१९ ला भाजपचे देवेंद्र फडणविस यांनी मुख्यमंत्री तर राष्ट्रवादी सोबत बंड करून अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, पण बहुमत सिद्ध न करु शकल्याने अवघ्या तीन दिवसातच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. या सर्व राजकीय घडामोडीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीची निर्मिती केली व तिन्ही पक्षांची विचारसरणी वेगळी असल्याने सरकार स्थापनेसाठी एक सामायिक कार्यक्रम ठरवण्यात आला आणि उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री पदासाठी निवड करण्यात आली.[] त्यापुढे हे मविआ सरकार अडीच वर्ष टिकले. आणि नंतर शिवसेनाच्याच आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ही हिंदुभूमिकापासून दूर गेली असं कारण देऊन शिवसेनेतील ५५ आमदारापैकी सुमारे ४० आमदारसोबत बंड केले.आणि महविकास आघाडी सरकार कोसळले.पुढे एकनाथ शिंदेंनी ४० आमदरासोबत भाजपा युती केली आणि राज्यात युतीचं सरकार स्थापन केले व राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

महाविकास आघाडीचे पक्षानिहाय संख्याबळ

[संपादन]

महाराष्ट्र विधानसभेत एकूण २८८ जागा आहेत, त्यामुळे सरकार स्थापनेसाठी १४५ आमदारांचे बहुमत लागते. २०१९ च्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील पक्षानिहाय संख्याबळ[]

अनुक्रम पक्ष चिन्ह आमदार (विधानसभा)
1 शिवसेना ५६
2 राष्ट्रवादी काॅंगेस पक्ष ५३
3 भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस ४४
4 बहुजन विकास आघाडी
5 समाजवादी पक्ष
प्रहार जनशक्ती पक्ष
शेतकरी कामगार पक्ष
अपक्ष
Total १६९/२८८

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "महाविकास आघाडीचे संख्याबळ वाढले". Loksatta. 2022-06-23 रोजी पाहिले.
  2. ^ "अरविंद सावंत यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा". Maharashtra Times. 2022-06-23 रोजी पाहिले.
  3. ^ "महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार, असा असणार अजेंडा?". 24taas.com. 2019-11-21. 2022-06-23 रोजी पाहिले.
  4. ^ "महाविकास आघाडीचे संख्याबळ वाढले". Loksatta. 2022-06-23 रोजी पाहिले.