भूड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?भूड
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —

१७° २०′ ११.०४″ N, ७४° ४१′ ०३.१२″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ १५.१६ चौ. किमी
अंतर
मुंबई पासून
सांगली पासून
विटा पासून

• २७५ किमी (जमिनी)
• ७३ किमी (जमिनी)
• १८ किमी (जमिनी)
जवळचे शहर विटा
जिल्हा सांगली जिल्हा
तालुका/के खानापूर (विटा)
लोकसंख्या
घनता
लिंग गुणोत्तर
साक्षरता
१,८८९ (२०११)
• १२५/किमी
त्रुटि: "१०००/११०४" अयोग्य अंक आहे /
७६.६२ %
भाषा मराठी
संसदीय मतदारसंघ सांगली
विधानसभा मतदारसंघ खानापूर
शासकीय संघटना ग्रामपंचायत भूड
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४१५३०९
• +त्रुटि: "९१ २३४७" अयोग्य अंक आहे
• MH 10

[[वर्ग:महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे]]

भूड हे महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातल्या खानापूर (विटा) तालुक्यातील एक गाव आहे. ते प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असलेले गाव आहे. श्री भूड सिद्धनाथ हे गावाचे आराध्य दैवत आहे. तेथे दरवर्षी चैत्र अष्टमीला देवाची यात्रा भरते.

श्री भूड सिद्धनाथ
श्री भूड सिद्धनाथ यात्रा

श्री भूड सिद्धनाथ भूड ता.खानापूर येथील श्री भूड सिद्धनाथांचे मूळ काशीक्षेत्री आहे. भूड सिद्धनाथ हे कालभैरव अवतार आहेत. भूड सिद्धनाथ हे काशीहून बालाघाट येथे आले.भूड परिसराला पूर्वी सिंदिबन असे नाव होते या ठिकाणी भुंडा नावाचा एक दैत्य वास करीत होता तो येथील लोकांना त्रास देत असे त्याचा वध श्री भूड सिद्धनाथांनी केला त्यावरून गावाचे नाव भूड असे पडले. भूड सिद्धनाथांची कमळाबाई नावाची एक भक्त होती. कमळाबाई चे माहेर भिलवडी व सासर पेड होते. तिची देवावर खूप श्रद्धा होती. तिने १२ वर्षे या ठिकाणी राहून देवाला पाणी घालणेची सेवा करून तपश्चर्या केली. असे सांगितले जाते की ती ऐके दिवशी स्नान करून ओल्या पडदीने गाभाऱ्यात आली त्यावेळी वाऱ्याने दिवा विझला त्यावेळी तिने ओला पदर दिव्यात पिळून माझे सत्व असेल तर दिवा पाण्याने पेटेल असे म्हणाली व दिवा पेटला. त्यावेळेपासून याठिकाणी चैत्री पाडव्यास पाण्याचा दिवा पेटवितात.कमळाबाईस शोधत तिचा नवरा व सासरा याठिकाणी आले तेंव्हा कमळाबाई या ठिकाणी गुप्त झाली आजही या मंदिराचे पायरीजवळ कमळाबाई ची दिवळी आहे. भूड सिद्धनाथाच्या यात्रेस चैत्र पाडव्यास कमळाबाईचे वंशज भिलवडीहून कापूस आणून भिजत घालतात व यात्रेस अष्टमी दिवशी तो दिवा पेटविला जातो. या ठिकाणी आबाचोर नावाचा एक चोर येथे लपून रहात असे मंदिरापासून साधारण १०० फूट अंतरावर देवखडी असे एक ठिकाण येथे आहे.ते आबा चोराचे ठिकाण मानले जाते श्री भूड सिद्धनाथाच्या मंदिरात कन्हेरीच्या पानांचा कौल लावला जातो.नवसाला पावणारा देव अशी देवांची ख्याती आहे. या त्रेच्यावेळी काकडा पेटविनेचा मान मादळमुठी येथील धावड यांना आहे.श्रींचे मंदिर खूप प्रशस्त आहे.

नाव[संपादन]

भूड हे नाव भूड गावाचे आराध्य दैवत श्री भूड सिद्धनाथाच्या नावावरून पडले आहे.

जनजीवन[संपादन]

२०११ च्या जनगणनेनुसार भूडची लोकसंख्या १८८९ आहे.

प्रशासन[संपादन]

नागरी प्रशासन[संपादन]

भूड गावची व्यवस्था ग्रामपंचायत भूड पाहते.

जिल्हा प्रशासन[संपादन]

अधिक माहितीसाठी पहा सांगली जिल्हा

भूड गाव महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यात आहे. जिल्ह्याचा प्रमुख जिल्हाधिकारी हा असतो व त्याचे काम सातबारा, जमीनजुमल्याच्या नोंदी ठेवणे, राज्य सरकाराकरिता सारावसुली, करवसुली व निवडणुकीचे व्यवस्थापन करणे हे असते.

शिक्षण[संपादन]

  • मराठी प्राथमिक शाळा
  • माध्यमिक विद्यालय
  • न्यू इंग्लिश स्कूल भूड

भूगोल[संपादन]

भूड सांगली शहरापासून ७३ किमी.वर, तर विटा शहरापासून १८ किमी. अंतरावर आहे. भूड चे क्षेत्रफळ १५.१६ चौरस किमी. आहे.

हवामान[संपादन]

भूड गावात उन्हाळा, (मॉन्सून) पावसाळा व हिवाळा हे ऋतू अनुभवायला मिळतात. उन्हाळा- मार्च ते मे (तापमान २५°-२९° से.) असतो व एप्रिल हा सर्वांत उष्ण महिना आहे. मे महिन्यात पावसाच्या सरी सुरू होतात. त्या महिन्यात उष्णता असतेच पण काही वेळेस दमटपणा अनुभवायला मिळतो.

खेळ[संपादन]

क्रिकेट हा सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. फुटबॉल, कबड्डीखोखो हे खेळ देखील खेळल जातात

जवळची ठिकाणे[संपादन]