रावसाहेब दानवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रावसाहेब दादाराव दानवे
रावसाहेब दानवे

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २००९
मतदारसंघ जालना
कार्यकाळ
इ.स. २००४ – इ.स. २००९
मागील रावसाहेब दानवे
पुढील रावसाहेब दानवे
कार्यकाळ
इ.स. १९९९ – इ.स. २००४
मागील उत्तमसिंह पवार
पुढील रावसाहेब दानवे
मतदारसंघ जालना

जन्म १८ मार्च, १९५५ (1955-03-18) (वय: ६९)
जालना, महाराष्ट्र
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी निर्मलाताई दानवे
अपत्ये संतोष दानवे व ३ मुली
निवास जालना
या दिवशी ऑगस्ट २५, २००८
स्रोत: [http://164.100.47.134/newls/Biography.aspx?mpsno=316

रावसाहेब दादाराव दानवे (इ.स. १९५५ - ) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. दानवेंचा राजकीय जीवनातला प्रवेश त्यांच्या ग्रामपंचायतीपासून झाला. दानवे यांनी १९८० मध्ये भोकरदन पंचायत समितीची सभापतिपदाची निवडणूक जिंकली व पुढे १९९० व १९९५ मध्ये ते विधान सभेवर निवडून आले. नंतर १९९९, २००४ व २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर ते लोकसभेवरही निवडून गेले.

रामेश्वर सहकारी साखर कारखाना उभारल्यानंतर आतापर्यंत दानवे यांनी तो स्वतःच्या ताब्यात ठेवला; भोकरदन तालुक्यात शैक्षणिक संस्थांचे जाळे निर्माण केले. भोकरदन व जाफराबाद पंचायत समित्यांवर नेहमीच अधिपत्य ठेवणाऱ्या दानवे यांचे जालना जिल्हा परिषदेवरही वर्चस्व राहिले आहे. जालना जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपद त्यांच्याकडेच राहिले. सध्या ते त्या बँकेचे संचालक आहेत. संघटनाकौशल्याशिवाय त्यांना एवढे राजकीय व सहकार क्षेत्रातील यश मिळाले, हे विशेष.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "तीन पक्षांमधील तीन दिग्गज नेत्यांचा उपेक्षेचा 'समान' धागा!". 30 जानेवारी 2021 रोजी पाहिले.