जालना जनशताब्दी एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जालना जनशताब्दी एक्सप्रेसचा मर्ग

जालना मुंबई जन शताब्दी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची दैनंदिन सेवा देणारी रेल्वेगाडी आहे. जन शताब्दी एक्सप्रेस ताफ्यामधील ही वेगवान आणि आरामदायी गाडी औद्योगिक शहर असलेल्या जालनाला महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबईसोबत जोडते. ह्यापूर्वी औरंगाबादपर्यंत धावणाऱ्या ह्या गाडीचा मार्ग ९ ऑगस्ट २०१५ पासून जालन्यापर्यंत वाढवण्यात आला.[१]

नावाची व्युत्पत्ती[संपादन]

हिंदी भाषेमध्ये जन या शब्दाचा अर्थ जनता म्हणजे लोक असा आहे. त्यामुळे जन शताब्दी यामधील शब्दाचा अर्थ सर्वसाधारण लोकांसाठी असलेली गाडी असा आहे. जनशताब्दी ही ब-याच मोठया शहरांना जोडणारी स्वस्त दरातील वेगवान गाडी आहे. शताब्दी एक्सप्रेसचे हे लघुत्तम रुप आहे.[२]

औरंगाबाद जन शताब्दी[संपादन]

१२०७१/७२-मुंबईच्या दादर रेल्वे स्थानक आणि औरंगाबाद दरम्यान धावणारी ही गाडी होती. मध्ये रेल्वेची ही रोजच्या रेाज वेगात धावणारी गाडी आहे. या गाडीची धाव नंतर मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत वाढविण्यात आली. १ जुलै, २०१३ रोजीच्या वेळापत्रकानुसार ही गाडी दादरपर्यंत सिमीत ठेवण्यात आली आहे आणि १२०५१/५२ च्या मडगांव जनशताब्दीच्या रेकबरोबर जोडलेली आहे.

गाडी क्रमांक १२०७२ जालन्याहून ०४:४५ वाजता निघते आणि दादरला १२.३० वाजता पोहोचते. ती सरासरी ३७४ कि.मी. (२३२ मैल ) अंतर ६.५ तासांमध्ये पार करते. औरंगाबाद, मनमाड, नाशिक, कल्याण, ठाणे आणि दादर याठिकाणी ती थांबा घेते. कसारा आणि इगतपुरी येथे गाडीचे कार्यान्वित थांबे आहेत.[३]

गाडी क्रमांक १२०७१ परतीची गाडी दादरवरून १४.०० वाजता निघते आणि जालन्याला २१:४०ला पोहोचते.[४] जालना जनशताब्दी ही ९ डब्यांची गाडी आहे. या गाडीला ६ जनशताब्दी खूर्ची यान, १ वातानुकूलित खूर्ची यान आणि २ मालवाहू डबे जोडलेले आहेत.[५]

दृष्टीक्षेपात गाडीचा तपशील[संपादन]


१२०७१ क्रमांकाची गाडी
गाडी क्रमांक गाडीचे नांव प्रारंभ प्रवासाचा दिवस
१२०७१ जनशताब्दी एक्सप्रेस[२] दादर सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार


प्रथम स्तर व्दितीय स्तर प्रथम वर्ग तृतीय स्तर खूर्चीयान शयनयान व्दितीय शयनयान इंजिन
वर्गवारी नाही नाही नाही नाही आहे नाही आहे नाही
डब्यांची संख्या निरंक निरंक निरंक निरंक निरंक १४ निरंक


अ.क्र. सांकेतांक स्थानक नांव मार्ग क्रमांक पाहोचण्याची वेळ सुटण्याची वेळ थांबण्याची वेळ (मिनिटांमध्ये) अंतर दिवस
१. डीआर दादर मूळ स्थानक १४:००
२. टीएनए ठाणे १४:२३ १४:२५ २:०० २५
३. केवायएन कल्याण १४:४४ १४:४७ ३:०० ४५
४. एनके नाशिक रोड १७:०८ १७:१० २:०० १७९
५. एमएमआर मनमाड १८:१५ १८:२५ १०.०० २५२
६. एडब्ल्यूबी औरंगाबाद २०:३५ २०:४० ०५:०० ३६५
७. जे जालना २१:४० शेवटचे स्थानक ४२८


१२०७२ क्रमांक गाडीचा तपशील[संपादन]

१२०७२ क्रमांकाची गाडी
गाडी क्रमांक गाडीचे नांव प्रारंभ प्रवासाचा दिवस
१२०७२ जनशताब्दी एक्सप्रेस दादर सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार


प्रथम स्तर व्दितीय स्तर प्रथम वर्ग तृतीय स्तर खूर्चीयान शयनयान व्दितीय शयनयान इंजिन
वर्गवारी नाही नाही नाही नाही आहे नाही आहे नाही
डब्यांची संख्या निरंक निरंक निरंक निरंक निरंक १४ निरंक


अ.क्र. सांकेतांक स्थानक नांव मार्ग क्रमांक पाहोचण्याची वेळ सुटण्याची वेळ थांबण्याची वेळ (मिनिटांमध्ये) अंतर दिवस
१. जे जालना मूळ स्थानक ०४:४५
२. एडब्ल्यूबी औरंगाबाद ०५:४० ०६:०० २०:०० ६३
२. एमएमआर मनमाड जंक्शन ०७:५० ०७:५५ ५:०० १७६
३. एनके नाशिक रोड ०८:५४ ०८:५५ ५:०० २४९
४. केवायएन कल्याण जंक्शन ११:२५ ११:३० ५:०० ३८३
५. टीएनए ठाणे ११:४९ ११:५० २:०० ४०४
६. डीआर दादर १२:० शेवटचे स्थानक ४२८

संदर्भ[संपादन]

  1. ^ "आजपासून धावणार जनशताब्दी".
  2. ^ a b "जनशताब्दी".
  3. ^ "औरंगाबाद जनशताब्दी-१२०७२".
  4. ^ "औरंगाबाद जनशताब्दी-१२०७१".
  5. ^ "इंडियनरेल.जीओव्ही.इन".

बाहय संदर्भ[संपादन]