ग्वादेलोप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ग्वादेलोप
Guadeloupe
फ्रान्सचा प्रदेश
Flag of Guadeloupe (local).svg
ध्वज

ग्वादेलोपचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
ग्वादेलोपचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी बासे-तेर
क्षेत्रफळ १,६२८ चौ. किमी (६२९ चौ. मैल)
लोकसंख्या ४,०५,७३९
घनता २५० /चौ. किमी (६५० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-GP, FR-971
प्रमाणवेळ यूटीसी−०४:००
संकेतस्थळ www.cr-guadeloupe.fr
ग्वादेलोपचा नकाशा

ग्वादेलोप (फ्रेंच: Guadeloupe) हा फ्रान्स देशाच्या २७ प्रदेशांपैकी एक प्रदेश व विभाग आहे. ग्वादेलोप बेट कॅरिबियन समुद्रामधील लेसर ॲंटिल्स द्वीपसमूहाचा भाग असून तो फ्रान्सच्या ५ परकीय (मुख्य भूमीपासून वेगळा) प्रदेशांपैकी एक आहे. ग्वादेलोप फ्रान्सचा अविभाज्य घटक मानला जात असल्यामुळे तो युरोपियन संघयुरोक्षेत्र ह्या दोन्ही संस्थांचा भाग आहे. बासे-तेर ही ग्वादेलोपची राजधानी तर प्वेंत-ए-पित्र हे येथील सर्वात मोठे शहर आहे. २०१३ साली ग्वादेलोपची लोकसंख्या ४ लाख होती. फ्रेंच ही येथील राजकीय भाषा आहे.

ग्वादेलोपचा शोध क्रिस्टोफर कोलंबसने इ.स. १४९३ मध्ये लावला. कोलंबसला येथे अननस हे फळ सापडले. १७व्या शतकात सेंट किट्स येथे यशस्वीरित्या वसाहत स्थापन केल्यानंतर फ्रेंच साम्राज्याने १६३५ साली ग्वादेलोप बेटावर तळ उघडला. येथील स्थानिक आदिवासी जमातीच्या लोकांना हळूहळू ठार करत फ्रेंचानी संपूर्ण बेटावर नियंत्रण मिळवले. १६८५ साली ग्वादेलोपला फ्रान्समध्ये सामावून घेण्यात आले. १८व्या शतकामध्ये ग्वादेलोपच्या नियंत्रणावरून फ्रेंच व ब्रिटिशांमध्ये अनेक लढाया झाल्या व ग्वादेलोपचा ताबा बदलत राहिला. येथील साखर उत्पादनामधून मिळणारे उत्पन्न कॅरिबियनमध्ये सर्वाधिक होते. २८ मे १८४८ रोजी ग्वादेलोपमध्ये गुलामगिरीवर बंदी घातली गेली.

सध्या ग्वादेलोपमधील बव्हंशी रहिवासी आफ्रिकन अथवा मिश्र वंशाचे असून येथील अर्थव्यवस्था पर्यटन व शेतीवर अवलंबून आहे. सेंट-जॉन पर्स ह्या नोबेल विजेत्या कवीने आपल्या कवितांमधून ग्वादेलोपच्या संस्कृतीवर प्रकाश टाकला आहे. प्रसिद्ध फ्रेंच फुटबॉलपटू थिएरी ऑन्री ह्यावे वडील ग्वादेलोप वंशाचे आहेत तर फुटबॉलपटू लिलियन थुरामचा जन्म येथे झाला होता.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: