कळंबोली
Appearance
(कलंबोली या पानावरून पुनर्निर्देशित)
कळंभोळी याच्याशी गल्लत करू नका.
| कळंबोली | |
| भारतामधील शहर | |
| देश | |
| राज्य | महाराष्ट्र |
| जिल्हा | रायगड जिल्हा |
| लोकसंख्या (२०००) | |
| - शहर | ४०,००० |
| प्रमाणवेळ | यूटीसी+०५:३० |
कळंबोली हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक गाव व सिडकोने बनवलेला नवी मुंबई शहराचा एक नोड आहे. पनवेल शहरापासून जवळ असलेल्या कळंबोली येथे मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग व राष्ट्रीय महामार्ग ४ येऊन जुळतात. कळंबोली रेल्वे स्थानक मध्य रेल्वेच्या वसई रोड-रोहा रेल्वेमार्गवर असून कोकण रेल्वेमार्गे जाणाऱ्या काही संथ पॅसेंजर रेल्वेगाड्या येथे थांबतात. २००० साली कळंबोलीची लोकसंख्या ४०,००० होती.
हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
