श्रीलंका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८७-८८
Appearance
श्रीलंका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८७-८८ | |||||
ऑस्ट्रेलिया | श्रीलंका | ||||
तारीख | १२ – १५ फेब्रुवारी १९८८ | ||||
संघनायक | ॲलन बॉर्डर | रंजन मदुगले | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
श्रीलंका क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९८८ दरम्यान एक कसोटी सामना खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. श्रीलंकेने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना खेळला. एकमेव कसोटी सामन्याव्यतिरिक्त श्रीलंकेने ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडसोबत एकदिवसीय तिरंगी मालिकेत देखील भाग घेतला. रंजन मदुगलेने एकमेव कसोटी सामना आणि तिरंगी मालिकेत श्रीलंकेचे नेतृत्व केले.
तिरंगी मालिकेत श्रीलंकेने निराशाजनक कामगिरी गेली. गट फेरीच्या ८ सामन्यांपैकी श्रीलंकेला फक्त एका सामन्यात विजय मिळवता आला. वाका मैदानावर खेळवला गेलेला एकमेव कसोटी सामना यजमान ऑस्ट्रेलियाने १ डाव आणि १०८ धावांनी जिंकला.
कसोटी मालिका
[संपादन]एकमेव कसोटी
[संपादन]१२-१५ फेब्रुवारी १९८८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- ऑस्ट्रेलियन भूमीवरचा श्रीलंकेचा पहिला कसोटी सामना.
- चंपक रमानायके (श्री) याने कसोटी पदार्पण केले.