२०१४ हिवाळी ऑलिंपिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१४ हिवाळी ऑलिंपिक
XXII हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
२०१२ च्या सोत्शी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांचा अधिकृत लोगो
२०१२ च्या सोत्शी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांचा अधिकृत लोगो
यजमान शहर सोत्शी
रशिया ध्वज रशिया


सहभागी देश ८८
सहभागी खेळाडू २,८०० (अंदाजे)
स्पर्धा ९८, १५ खेळात
समारंभ
उद्घाटन फेब्रुवारी ७


सांगता फेब्रुवारी २३
अधिकृत उद्घाटक व्लादिमिर पुतिन
खेळाडूंची प्रतिज्ञा रुस्लान झाकारोव्ह
मैदान फिश्त ऑलिंपिक स्टेडियम


◄◄ २०१० ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह २०१८ ►►
सोत्शी is located in युरोपियन रशिया
सोत्शी
सोत्शी
सोत्शीचे रशियामधील स्थान
ह्या स्पर्धेप्रित्यर्थ बनवण्यात आलेली १०० रूबलची नोट

२०१४ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धेची २२वी आवृत्ती आहे. ही स्पर्धा ते फेब्रुवारी २३ दरम्यान रशिया देशाच्या क्रास्नोदर क्रायमधील सोत्शी ह्या शहरामध्ये खेळवली जात आहे.

ह्या स्पर्धेसाठी सोत्शीची निवड ४ जुलै २००७ रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या ग्वातेमाला सिटी येथे झालेल्या बैठकीमध्ये करण्यात आली. यजमानपदासाठी ऑस्ट्रियामधील जाल्त्सबुर्गदक्षिण कोरियामधील प्याँगचँग ही इतर शहरे उत्सुक होती. सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर रशियामध्ये खेळवली जाणारी ही पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा आहे.

ह्या स्पर्धेसाठी रशियामधील काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर संपूर्णपणे नवीन क्रीडा संकूल बांधले गेले आहे. ह्या स्पर्धेसाठी पायाभूत सुविधा (रेल्वे, महामार्ग, विमानतळ) सुधारण्यासाठी तसेच अनेक सोयी नव्याने बांधण्यासाठी एकूण ५१ अब्ज अमेरिकन डॉलर इतका खर्च आला आहे. सोत्शी २०१४ ही आजवरच्या इतिहासामधील सर्वात खर्चिक क्रीडा स्पर्धा आहे.

खेळ[संपादन]

२०१४ ऑलिंपिक स्पर्धेमध्ये खालील १५ हिवाळी खेळांचे आयोजन केले जात आहे. प्रत्येक खेळापुढील कंसांत त्या खेळाचे प्रकार दर्शवले आहेत.

सहभागी देश[संपादन]

२०१४ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी एकूण ८८ देशांनी पात्रता मिळवली.

सहभागी देश

२०१० मध्ये सहभागी असलेले परंतु २०१४ मध्ये सहभागी नसलेले देश. २०१४ मध्ये सहभागी असलेले परंतु २०१० मध्ये सहभागी नसलेले देश.
कोलंबिया कोलंबिया
इथियोपिया इथियोपिया
घाना घाना
उत्तर कोरिया उत्तर कोरिया
सेनेगाल सेनेगाल
दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह
डॉमिनिका डॉमिनिका
लक्झेंबर्ग लक्झेंबर्ग
माल्टा माल्टा
पेराग्वे पेराग्वे
फिलिपिन्स फिलिपिन्स
थायलंड थायलंड
पूर्व तिमोर पूर्व तिमोर
टोगो टोगो
टोंगा टोंगा
व्हेनेझुएला व्हेनेझुएला
यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह
झिम्बाब्वे झिम्बाब्वे

a भारतीय ऑलिंपिक संघाला डिसेंबर २०१२ पासून निलंबित केले गेले असल्यामुळे भारत देशाचे उत्सुक खेळाडू ऑलिंपिक ध्वज वापरून वैयक्तिकपणे ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.[१] ११ फेब्रुवारी रोजी आय.ओ.ए.चे निलंबन मागे घेतले गेले व भारतीय खेळाडूंना भारताचा ध्वज वापरण्यास परवानगी देण्यात आली.[२]

पदक तक्ता[संपादन]

Key

   *   यजमान संघ

 क्रम  NOC सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 रशिया रशिया * 13 11 9 33
2 नॉर्वे नॉर्वे  11 5 10 26
3 कॅनडा कॅनडा  10 10 5 25
4 अमेरिका अमेरिका  9 7 12 28
5 नेदरलँड्स नेदरलँड्स  8 7 9 24
6 जर्मनी जर्मनी  8 6 5 19
7 स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड  6 3 2 11
8 बेलारूस बेलारूस  5 0 1 6
9 ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया  4 8 5 17
10 फ्रान्स फ्रान्स  4 4 7 15
11 पोलंड पोलंड  4 1 1 6
12 चीन चीन  3 4 2 9
13 दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया  3 3 2 8
14 स्वीडन स्वीडन  2 7 6 15
15 चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक  2 4 2 8
16 स्लोव्हेनिया स्लोव्हेनिया  2 2 4 8
17 जपान जपान  1 4 3 8
18 फिनलंड फिनलंड  1 3 1 5
19 युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम  1 1 2 4
20 युक्रेन युक्रेन  1 0 1 2
21 स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया  1 0 0 1
22 इटली इटली  0 2 6 8
23 लात्व्हिया लात्व्हिया  0 2 2 4
24 ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया  0 2 1 3
25 क्रोएशिया क्रोएशिया  0 1 0 1
26 कझाकस्तान कझाकस्तान  0 0 1 1
एकूण 99 97 99 295

संदर्भयादी[संपादन]

  1. ^ "Sochi Games: Four Indian skiers to go as independent athletes". Zee news. 31 December 2013. 31 December 2013 रोजी पाहिले.
  2. ^ "IOC Executive Board lifts suspension of NOC of India". 11 February 2014 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: