ऑलिंपिक खेळात जपान
Appearance
ऑलिंपिक खेळात जपान | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||||
पदके | सुवर्ण १३९ |
रौप्य १३९ |
कांस्य १५७ |
एकूण ४३५ |
जपान देश काही अपवाद वगळता १९१२ सालापासून सर्व उन्हाळी व १९२८ सालापासून सर्व हिवाळी स्पर्धांमध्ये सहभागी झाला आहे. दुसऱ्या महायुद्धात पराभूत झाल्यानंतर १९४८ सालच्या उन्हाळी व हिवाळी स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास जपानला मनाई करण्यात आली होती. १९८० मॉस्को स्पर्धेवर अनेक देशांप्रमाणे जपानने देखील बहिष्कार टाकला होता. जपानी खेळाडूंनी आजवर एकूण ४३५ पदके जिंकली आहेत.
यजमान
[संपादन]जपानने आजवर खालील तीन ऑलिंपिक स्पर्धा आयोजीत केल्या आहेत. तसेच २०२० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेचे यजमानपद तोक्योला मिळाले आहे.
स्पर्धा | यजमान शहर | तारखा | देश | खेळाडू | खेळ प्रकार |
---|---|---|---|---|---|
१९६४ उन्हाळी ऑलिंपिक | तोक्यो | १० – २४ ऑक्टोबर | ९३ | ५,१५१ | १६३ |
१९७२ हिवाळी ऑलिंपिक | सप्पोरो | ३ – १३ फेब्रुवारी | ३५ | १,००६ | ३५ |
१९९८ हिवाळी ऑलिंपिक | नागानो | ७ – २२ फेब्रुवारी | ७३ | २,१७६ | ६८ |