समता फाउंडेशन, नेपाळ
Appearance
समता फाउंडेशन ही नेपाळ मधील एक सामाजिक संस्था आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून इ.स. २००९ मध्ये नेपाळमध्ये स्थापन करण्यात आली. या संस्थेतर्फे दलितांच्या हक्कांसाठी लढा दिला जातो. सामाजिक व्यवस्थेमध्ये समानता आणणे आणि दलितांना मानवी हक्कांबाबत जागृत करण्याचे कार्य ही संस्था करते. तसेच युरोपियन युनियनच्या सहकार्याने जगभरातील दलितांना मानवी हक्कांबाबत प्रशिक्षणही दिले जाते. पदम सुंदास हे संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष आहेत.[१]