"भगवद्‌गीता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ९८: ओळ ९८:
* श्रीमद्गीतानुवाद (मराठी समश्लोकी, शि.शा. कुलकर्णी)
* श्रीमद्गीतानुवाद (मराठी समश्लोकी, शि.शा. कुलकर्णी)
* श्रीमद्भगवद्गीता मूल, पदच्छेद, अन्वयार्थ व सुगमटीपांसह (मराठी, जयदयाल गोयन्दका)
* श्रीमद्भगवद्गीता मूल, पदच्छेद, अन्वयार्थ व सुगमटीपांसह (मराठी, जयदयाल गोयन्दका)
* श्रीमद्भगवद्गीता : सान्वयपदबोध सार्थ आणि सटीक (१९०२, [[कृष्णराव अर्जुन केळूसकर]]). या ग्रंथाची दुसरी आवृत्ती दामोदर सावळाराम यंदे यांनी १९३०मध्ये काढली.
* [[:s:mr:श्रीमद्भवद्गीतारहस्य|श्रीमद्भवद्गीतारहस्य]] (गीतारहस्य) - लोकमान्य [[बाळ गंगाधर टिळक]])
* [[:s:mr:श्रीमद्भवद्गीतारहस्य|श्रीमद्भवद्गीतारहस्य]] (गीतारहस्य) - लोकमान्य [[बाळ गंगाधर टिळक]])
* भगवद्‌गीता सर्वांसाठी (विनय पत्राळे)
* भगवद्‌गीता सर्वांसाठी (विनय पत्राळे)
ओळ १०४: ओळ १०५:
* मुलांची गीता ([[वि.कृ. श्रोत्रिय]])
* मुलांची गीता ([[वि.कृ. श्रोत्रिय]])
* [[मोक्ष]] का मुक्ती ? - अजय रा. पवनीकर
* [[मोक्ष]] का मुक्ती ? - अजय रा. पवनीकर
* सान्वय - सार्थ - सटीक श्रीमद्भगवद्गीता (कृ.अ.केळूसकर)
* सुबोधिनी टीका (संस्कृत) - श्रीधर स्वामी
* सुबोधिनी टीका (संस्कृत) - श्रीधर स्वामी
* [[ज्ञानेश्वरी]] - संत [[ज्ञानेश्वर]])
* [[ज्ञानेश्वरी]] - संत [[ज्ञानेश्वर]])

२१:०३, १२ एप्रिल २०१९ ची आवृत्ती

हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग
aum symbol
वेद
ऋग्वेद · यजुर्वेद
सामवेद · अथर्ववेद
वेद-विभाग
संहिता · ब्राह्मणे
आरण्यके  · उपनिषदे
उपनिषदे
ऐतरेय  · बृहदारण्यक
ईश  · तैत्तरिय · छांदोग्य
केन  · मुंडक
मांडुक्य  ·प्रश्न
श्वेतश्वतर  ·नारायण
कठ
वेदांग
शिक्षा · छंद
व्याकरण · निरुक्त
ज्योतिष · कल्प
महाकाव्य
रामायण · महाभारत
इतर ग्रंथ
स्मृती · पुराणे
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई
पंचतंत्र · तंत्र
स्तोत्रे ·सूक्ते
मनाचे श्लोक · रामचरितमानस
शिक्षापत्री · वचनामृत


भगवद्‌गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ आहे. वेदांच्या अखेरच्या रचनेतील एक ग्रंथ. 'गीतोपनिषद' म्हणूनही प्रसिद्ध.

त्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे.

यात एकूण १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत.

काही भारतीय या ग्रंथाला पवित्र धर्मग्रंथ समजतात. त्यामुळे न्यायालयात गीतेवर हात ठेवून शपथ घेण्याची प्रथा पडली आहे. प्रत्यक्षात हा धार्मिक ग्रंथ आहे आणि त्यामुळे तो पवित्र आहे

गीताई हे आचार्य विनोबा भावे यांनी केलेले गीतेचे मराठीत ओवीबद्ध भाषांतर आहे.

भगवत्‌ गीता हा हिंदुस्थानातला अतिशय महत्त्वाचा व मानवी इतिहासातल्या ग्रंथांपैकी अतिशय तत्त्वज्ञानावर आधारलेला महत्त्वाचा संदर्भग्रंथ आहे. हा ग्रंथ संस्कृत भाषेत काव्यस्वरूपात लिहिलेला आहे. 'महाभारत' या महाकाव्याचा एक भाग असलेला हा ग्रंथ १८ अध्यायांचा (७०० श्लोक) आहे. महाभारतातल्या महायुद्धाच्या वेळेस भगवान श्रीकृष्णांनी गीता अर्जुनास मार्गदर्शन स्वरूपात सांगितली, असे महाभारताच्या कथेत म्हटले आहे.. हिंदू (वैदिक) धर्माच्या मते भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे स्वरूप मानले जातात. हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे यांचे मार्गदर्शन करतो असे मानले जाते.

सामान्यजनांमध्ये भगवत्-गीता, 'गीता' या नावाने ओळखली जाते.

कुरुक्षेत्रावर रणांगणामधे युद्धाच्या सुरुवातीला सांगितली गेलेली गीता हा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद असून त्यामधे श्रीकृष्णाने अर्जुनाच्या शंकांचे निरसन केले आहे. विविध उदाहरणे आणि उपमांचा आधार घेत श्रीकृष्णाने अर्जुनाला योग आणि वेदान्त यांबद्दल मार्गदर्शन केले आहे. यामुळे हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा मार्गदर्शकपर ग्रंथ आणि मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सुखकर करण्याकरता उपयुक्त ठरेल असा संदर्भग्रंथ असे गीतेचे स्वरूप आहे. जगातील विविध देशांतले व विविध धर्मांतले असंख्य तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी या ग्रंथाबद्दल कायमच गौरवोद्गार काढले आहेत आणि मानवी जीवनाच्या अथांग सागरामधे गीतेला दीपस्तंभाचे स्थान दिले आहे.

भगवद्गीतेत असे सांगितले गेले आहे की, गीता सांगत असताना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला स्वतःचे विश्वरूप दर्शन दाखविले आणि त्याला तो देव असल्याचे पटवले. (श्रीकृष्णाने असे विश्वरूपदर्शन बालपणी यशोदामातेला आणि वृद्धापकाळी उत्तंक ऋषीलाही दाखविले आहे!)

भारतीय संस्कृतीमधे गीतेचे स्थान इतके महत्त्वाचे आहे की गीतेला 'योगोपनिषद' किंवा 'गीतोपनिषद' ही म्हणले जाते आणि तिला उपनिषदांचा दर्जा दिला जातो. गीता उपदेशपर असल्याने आणि ती उपनिषदांचा अर्थ सांगत असल्याने तिला 'उपनिषदांचे उपनिषद' असेही म्हणले जाते. गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान आणि आनंद मिळतो व त्याचप्रमाणे मोक्षाचा मार्ग सापडण्यास मदत होते म्हणून गीतेला 'मोक्षशास्त्र' म्हणले गेले आहे.

गीता निर्मितीचा काळ

महाभारतातल्या 'भीष्म पर्वा'मध्ये गीतेचा अंतर्भाव आहे. महाभारतातल्या २५व्यापासून ते ४२व्या अध्यायांत संपूर्ण गीता येते. संस्कृत भाषेतल्या विविध अलंकारांचा वापर करून लिहिली गेलेली गीता छंदोबद्ध आहे. त्यामुळे भारतामधे ती 'गायली' जाते.

उपनिषदांनंतर आणि तत्त्वज्ञानाचा पाया असलेल्या सूत्रांच्या आधी गीता लिहिली गेली असे मानण्यात येते. ख्रिस्तजन्माच्या आधी काही शतके गीता लिहिली गेली यावर सर्वांचे एकमत असले तरी गीतेच्या निश्चित कालावधीबाबत तज्ज्ञांमधे एकवाक्यता नाही. त्याचप्रमाणे हिंदू धर्मातल्या बहुतेक सगळ्या अर्वाचीन ग्रंथांप्रमाणेच गीतेच्या लेखकाची निश्चित माहिती आधुनिक युगातल्या जाणकारांना नाही परंतु तरीही महाभारतात समाविष्ट असल्याने गीता 'महर्षी व्यास' यांनी लिहिली असे मानले जाते.

छंदाच्या रचनेच्या अभ्यासावरून काही जाणकारांनी असेही मत प्रदर्शित केले आहे की गीता महाभारतात नंतर घालण्यात आली.

हिंदुस्थानातील बहुतेक सर्व ज्ञान हे मौखिक स्वरूपात एका पिढीकडून दुसर्‍या पिढीला ठेवा स्वरूपात देण्याची प्रथा असल्याने आधुनिक अभ्यासकांच्या मतापेक्षा गीता कित्येक वर्षे जुनी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच गीतेमधील तत्त्वज्ञान हे कालातीत आहे असे मानले जाते. कुठल्याही युगात त्याचे महत्त्व आपण नाकारू शकत नाही. म्हणूनच विद्वानांच्या मते अध्यात्मिकदृष्ट्या गीता कधी लिहिली गेली अथवा कधी सांगितली गेली याला फारसे महत्त्व नाही.

गीतेच्या विविध आवृत्त्या व संबंधित ग्रंथ संपदा

भगवद्‌गीतेच्या प्रभावातून हजारो वर्षांपासून वेगवेगळ्या कालखंडांत इतर विविध गीता निर्माण झाल्या. यात अष्टावक्रगीता, ईश्वरगीता, कपिलगीता, गणेशगीता, पराशरगीता, भिक्षुगीता, व्यासगीता, रामगीता, शिवगीता, सूर्यगीता, हंसगीता, इतकेच काय, पण यमगीताही लिहिली गेली. कूर्मपुराणात उत्तर विभागात पहिल्या अकरा अध्यायांत ईश्वरगीता तर पुढील अध्यायांत व्यासगीता आहे. गणेशपुराणात शेवटच्या क्रीडा खंडात १३८ ते १४९ अध्यायांत गणेशगीता आहे.[१]

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज । अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ॥ १८.६६ ॥

सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कर आणि केवळ मलाच शरण ये. मी तुला सर्व पांपापासून मुक्त करीन. तू भयभीत होऊ नकोस.

गीतेतील अध्यायांची नावे

  • अध्याय १ - अर्जुनविषादयोग
  • अध्याय २ - सांख्ययोग
  • अध्याय ३ - कर्मयोग
  • अध्याय ४ - ज्ञानसंन्यासयोग
  • अध्याय ५ - कर्मसंन्यासयोग
  • अध्याय ६ - आत्मसंयमयोग
  • अध्याय ७ - ज्ञानविज्ञानयोग
  • अध्याय ८ - अक्षरब्रह्मयोग
  • अध्याय ९ - राजविद्याराजगुह्ययोग
  • अध्याय १० - विभूतियोग
  • अध्याय ११ - विश्वरूपदर्शनयोग
  • अध्याय १२ - भक्तियोग
  • अध्याय १३ - क्षेत्रक्षेज्ञविभागयोग
  • अध्याय १४ - गुणत्रयविभागयोग
  • अध्याय १५ - पुरुषोत्तमयोग
  • अध्याय १६ - दैवासुरसंपविभागयोग
  • अध्याय १७ - श्रद्धात्रयविभागयोग
  • अध्याय १८ - मोक्षसंन्यासयोग

गीतेची अठरा नावे

ज्या प्रमाणे भगवद्‌गीतेत अठरा अध्याय आहेत तशीच प्रमुख अठरा नावे सुद्धा आहेत. जे गेय स्वरुपात म्हटले जातात.

गीता, गंगा, गायत्री, सीता, सत्या, सरस्वती  ब्रह्मविद्या, ब्रह्मवल्ली, त्रिसंध्या, मुक्तगेहिनी, अर्धमात्रा, चिदानंदा, भवग्नी, भय नाशिनी, वेदत्रयी, परा, अनंता, तत्वार्थ ज्ञानमंजिरी

ही अठरा नावे नित्य घेतल्यास गीता पठणाचे पुण्य लाभते असे मानले जाते. [२]

अधिकरणें

१ ऐतिह्य कथन, २ दैन्य प्रदर्शन, ३ श्रीकृष्णास शरण, ४ आत्मप्रबोधन, ५ स्वधर्मपालन, ६ बुद्धियोग, ७ स्थितप्रज्ञता, ८ कर्मयोग, ९ नित्यकर्म, १० लोकसंग्रह, ११ शासनपालन, १२ शत्रुसंहार, १३ जन्मकर्म, १४ कर्म-अकर्म, १५ प्राज्ञमुखें ज्ञान, १६ सांख्ययोग, १७ सदामुक्तता, १८ योगारुढ होणें, १९ समाधि अभ्यास, २० शाश्वत योग, २१ एकसूत्रता, २२ शरणता, २३ मोह त्यागून ज्ञानविज्ञान साधन, २४ संतत स्मरण, २५ भूत लय-उत्पत्ति, २६ बोधक्षयोदय, २७ ईश्वरी सत्त, २८ हरिभावना, २९ निष्काम भक्ति, ३० ईशस्मरण, ३१ विभूतिसंक्षेप, ३२ विभूतिविस्तार, ३३ ईश्वरी रूप, ३४ ईश्वरी रूपावलोकन, ३५ क्षमापनस्तोत्र, ३६ रूपविसर्जन, ३७ भक्ततुलना, ३८ सुलमसाधन, ३९ ईश्वरगुणगान, ४० क्षेत्राक्षेत्रशोधन, ४१ प्रकृतित्याग, ४२ निर्लिप्त आत्मता, ४३ त्रिगुण संसार, ४४ गुणमुक्तता, ४५ वृक्ष (अश्वत्थ) छेन्न, ४६ जीवात्मादर्शन, ४७ जीवनव्याघ्र, ४८ पुरुषोत्तम, ४९ दोन संपदा, ५० असुरवर्णन, ५१ शास्त्रीय संयमानें नरकद्वार टाळणें, ५२ श्रद्धाविभाग, ५३ स्वाभाविक गुण, ५४ आहार यज्ञाचारण, ५५ ॐ तत्सदर्पण, ५६ त्यागमीमांसा, ५७ कर्मनिर्णय, ५८ त्रिधावृत्ति, ५९ पूर्णसाधना व ६० अर्जुनबोध, हीं साठ गीतेचीं अधिकरणें अथवा विषय होत.

भगवद्गीतेवर आधारित अन्य मराठी/संस्कृत/हिंदी ग्रंथ

संदर्भ

  1. ^ गीतामाऊलीची लेकरं म.टा जुलै २२, २००७
  2. ^ | स्तोत्र दुवा=dindoripranit.org | ग्रंथ=नित्यसेवा | प्रकाशन=श्री स्वामी सेवा प्रकाशन

बाह्य दुवे

विकिस्रोत
विकिस्रोत
भगवद्‌गीता हा शब्द/शब्दसमूह
विकिस्रोत, या ऑनलाईन मुक्त मराठी ग्रंथालयात पाहा.

https://archive.org/details/Shrimad_Bhagavad_Gita-Sanskrit_Audio