पाराशर व्यास
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
वेदव्यास | |
![]() | |
मूळ नाव | कृष्ण द्वैपायन |
भाषा | संस्कृत |
साहित्यरचना | महाभारत, नवग्रह स्तोत्र, कल्कि पुराण |
वडील | पराशर ऋषि |
आई | सत्यवती |
पत्नी | पिंजला (वाटिका) |
अपत्ये | शुकदेव |
पराशर ऋषींचे पुत्र महर्षी वेदव्यास यांनी महाभारत या महाकाव्याची रचना केली. त्यांचे दुसरे नाव कृष्णद्वैपायन व्यास असेही म्हणतात; कारण महर्षी वेदव्यास यांनी द्वैपायन बेटावर तपश्चर्या केल्यामुळे आणि ते रंगाने काळे असल्यामुळे ते कृष्ण द्वैपायन म्हणून ओळखले जाऊ लागला. पुढे वेदांवर भाष्य केल्यामुळे ते वेदव्यास या नावाने प्रसिद्ध झाले. [१]
महाभारत हा एक प्राचीन संस्कृत काव्यग्रंथ आहे. महर्षी व्यास यांनी हा ग्रंथ गणपतीकडून लिहून घेतला अशी मान्यता आहे.[२][१]
आख्यायिका[संपादन]
प्रत्येक द्वापारयुगामध्ये व्यासांच्या रूपाने विष्णूने अवतार घेऊन वेदांचे विभाग सादर केले. पहिल्या द्वापारयुगामध्ये स्वतः ब्रह्म वेद व्यास झाले, दुसऱ्यात प्रजापती, तिसऱ्या द्वापारयुगामध्ये शुक्राचार्य व चौथ्या युगात बृहस्पति वेदव्यास झाले. त्याचप्रमाणे सूर्य, मृत्यू, इंद्र, धनंजय, कृष्ण द्वैपायन, अश्वत्थामा इत्यादी अठ्ठावीस वेदव्यास झाले. अशा प्रकारे अठ्ठावीस वेळा वेदांचे विभाजन झाले.
पाराशर व्यासांनी अठरा पुराणांची रचना केली, असे मानले जाते.[१]
महर्षी व्यासांनी एवढे काम करून ठेवले आहे की त्यानंतर वेगळे काहीच उरले नाही, हे सांगणारी 'व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्' ही उक्ती प्रसिद्ध आहे.
महाभारत म्हणजे मानवी जीवनात उत्पन्न होणाऱ्या सर्व प्रश्नांचा विचार करून मार्ग दाखवणारा ग्रंथ आहे. महाभारतात जे असेल ते अन्य ग्रंथात असू शकेल पण जे महाभारतात नाही ते-'न तत्र अन्यत्र!' ते कुठेहि असणार नाही, अशी व्यासांनी लिहिलेल्या महाभारत ग्रंथाची प्रसिद्धी आहे.
आणि ते सप्तचिरंजीवांतील एक असल्याचे मानले जाते.[३]
जन्म आणि पौराणिक कथा[संपादन]
धर्म पुराणानुसार इ.स.पू. ३००० च्या सुमारे आषाढ महिन्याच्या शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी महर्षि वेद व्यास यांचा जन्म झाला होता. महर्षि वेद व्यास अत्यंत ज्ञानी, तेजस्वी आणि महान ऋषी होते. त्यांना चारही वेदांचे पूर्ण ज्ञान होते. म्हणूनच त्यांना वेद व्यास म्हटले गेले.[४]
आषाढ शुक्ल पौर्णिमा हा गुरु पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो[५]
पौराणिक कथांनुसार, प्राचीन काळी महर्षि पराशर प्रवास करत असताना त्यांना एक स्त्री दिसली. ती नाव सत्यवती ऊर्फ मत्स्यगंधा होती. मासे पकडणाऱ्या एका कोळ्याची ती मुलगी होती. मत्स्यगंधा दिसायला फारच सुंदर आणि आकर्षक दिसत होती पण तिच्या शरीराला माशांचा गंध येई, म्हणून सत्यवतीला 'मत्स्यगंधा'. म्हणून ओळखले जाते.[६]महान ऋषि पराशर यांच्या सहवासात देवी सत्यवतीला (मत्स्यगंधा) कुमारिकेला पुत्रप्राप्ती झाली.
मत्सगंधा कुमारिका पुढे हस्तिनापूर राज्याचे राजा शंतनु यांची पत्नी झाली, व तिचे नाव देवी सत्यवती झाले. [७][८]
अठरा पुराणे आणि त्यांची श्लोकसंख्या [९][संपादन]
- अग्नि पुराण(१५,०००)
- कूर्म पुराण(१७,०००)
- गरुड पुराण(१९,०००)
- नारद पुराण(२५,०००)
- पद्म पुराण(५५,०००)
- ब्रह्म पुराण (१०,०००)
- ब्रह्म वैवर्त पुराण(१८,०००)
- ब्रह्मांड पुराण(१२,०००)
- भविष्य पुराण(१४,५००)
- भागवत पुराण(१८,०००)
- मत्स्य पुराण(१४,०००)
- मार्कंडेय पुराण(९,०००)
- लिंग पुराण(११,०००)
- वराह पुराण(२४,०००)
- वामन पुराण(१०,०००)
- विष्णु पुराण(२३,०००)
- शिव पुराण(२४,०००)
- स्कंद पुराण(८१,१००)
उपपुराणे[संपादन]
कल्की पुराण
व्यासवंदना[संपादन]
प्राचीन ग्रंथांनुसार महर्षि वेद व्यास हे स्वतः देवाचे रूप होते. त्यांची स्तुती पुढील श्लोकांनी केली आहे.[१०] ======
नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्रः।
येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्ज्वालितो ज्ञानमयप्रदीपः।।
मराठी अर्थ - महाभारतासारख्या ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या अशा प्रचंड बुद्धीच्या महर्षि वेदव्यास यांना माझे नमस्कार असो.
व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे।
नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नम:।।[११]
मराठी अर्थ -
ब्रह्मज्ञानाचा निधी असणारे व्यास हे विष्णूचे रूप आहेत आणि विष्णू हा व्यासाचे रूप आहे,
वसिष्ठ मुनी यांच्या वंशजांचा माझा नमस्कार असो. (वसिष्ठाचा मुलगा होता 'शक्ति'; शक्तीचा मुलगा पराशर आणि पराशरांचा मुलगा व्यास.
व्यासांवर लिहिलेली मराठी पुस्तके[संपादन]
- महर्षि वेदव्यास (कृष्णाजी कोल्हटकर)
- महर्षी वेदव्यास (कादंबरी, लेखक - सुधाकर शुक्ल)
- महर्षी व्यास (कादंबरी, लेखक -जनार्दन ओक)
- व्यासपर्व (ललित, लेखिका - दुर्गा भागवत)
संदर्भ यादी[संपादन]
- ↑ a b c "वेदव्यास". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2020-01-08.
- ^ "महाभारत". विकिपीडिया. 2019-10-27.
- ^ "Vyasa". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-12-28.
- ^ admin. "महर्षि वेदव्यास के बारे में कुछ अनसुने तथ्य Maharishi Vedvyas Secret Facts". Gyan Manthan (इंग्रजी भाषेत). 2019-09-14 रोजी पाहिले.
- ^ नवभारतटाइम्स.कॉम. "ऐसे पैदा हुए थे गुरु महर्षि व्यास, इनके जन्मदिन पर मनाते हैं गुरु पूर्णिमा". नवभारत टाइम्स (हिंदी भाषेत). 2019-09-14 रोजी पाहिले.
- ^ नवभारतटाइम्स.कॉम. "ऐसे पैदा हुए थे गुरु महर्षि व्यास, इनके जन्मदिन पर मनाते हैं गुरु पूर्णिमा". नवभारत टाइम्स (हिंदी भाषेत). 2019-09-14 रोजी पाहिले.
- ^ "गुरुपौर्णिमा". विकिपीडिया. 2019-07-17.
- ^ admin. "महर्षि वेदव्यास के बारे में कुछ अनसुने तथ्य Maharishi Vedvyas Secret Facts". Gyan Manthan (इंग्रजी भाषेत). 2019-09-14 रोजी पाहिले.
- ^ "पुराण". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2019-08-17.
- ^ "वेदव्यास". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2019-07-19.
- ^ "वंदे मातृ संस्कृति". www.facebook.com. 2019-09-13 रोजी पाहिले.