Jump to content

भीम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यक्षगानाच्या एका प्रयोगामध्ये द्रौपदी व भीम

भीम ही महाभारतातील एक प्रमुख व्यक्तिरेखा असून, तो पांडवांमध्ये दुसरा आहे. तो वायूच्या कृपेने कुंतीस झालेला पुत्र होता. सर्व पांडवांमध्ये तो विशाल आकारमानाचा व अजोड सामर्थ्याचा होता. जन्मत: भीम वजनदार होता . कुंतीला त्याचे वजन सांभाळता न आल्याने, तो तिच्या हातातून निसटला. खालीएक शिळा होती , त्यावर पडला. कुंती घाबरली . तिने भीमला उचलून घेतले, ती खालची शिळा फुटली, त्यामुळे 'शिळाभंजन' हे एक नाव भीमास प्राप्त झाले.

द्रौपदीशी विवाह होण्याआधी भीमाचा हिडींबा या राक्षस कन्येशी विवाह झाला होता. हिडींबेचा भाऊ हिडींब याला भीमाने ठार केले होते. घटोत्कच हा हिडींबा व भीम यांचा पुत्र होय.

कुंति व इतर पांडवांसह एकचक्रा नगरीमधे एका ब्राम्हणाच्या घरी वास्तव्यास असताना बकासूर नावाच्या राक्षसास देखील भीमानेच ठार केले होते.

द्युतप्रसंगामधे दुर्योधनाने आपली उघडी मांडी दाखवून द्रौपदीला अपमानित व लज्जित केले होते, त्या अपमानाचा प्रतिशोध घेण्यासाठी भीमाने दुर्योधनाची मांडी फोडण्याची प्रतिज्ञा केली होती. तसेच, द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुःशासनाची छाती फोडून, त्याचे रक्त पिण्याची प्रतिज्ञादेखील भीमाने केली होती. या दोन्ही प्रतिज्ञा महाभारतीय युद्धामधे भीमाने पूर्ण केल्या.

अज्ञातवासात असताना विराट राजाच्या दरबारी भीमाने बल्लव या नावाने आचाऱ्याची नोकरी पत्करली होती. तेथेच द्रौपदीवर अतिप्रसंग करू पहाणारा विराट राजाचा मेहुणा व राणी सुदेष्णा हिचा सख्खा भाऊ कीचक याचा वध भीमाने केला होता.

महाभारतीय युद्धात दुर्योधनाचा मृत्यू भीमाशी घडलेल्या द्वंद्व गदायुद्धात झाला.

महाभारतीय युद्धामधे सर्व कौरव एकट्या भीमानेच मारले होते.