विचित्रवीर्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विचित्रवीर्य हे महाभारतातील एक पात्र आहे. तो हस्तिनापूरचा राजा शंतनूसत्यवती यांचा मुलगा, चित्रांगदाचा लहान भाऊ व भीष्माचा सावत्र भाऊ होता.

चित्रांगदाच्या मृत्यूनंतर भीष्माच्या देखरेखीखाली विचित्रवीर्याला हस्तिनापूरचा राजा बनवले गेले. भीष्माची इच्छा असते की त्याचा विवाह काशीच्या राजाच्या मुली अंबा, अंबिकाअंबालिका यांच्याशी व्हावा. मात्र जुन्या वितुष्टामुळे काशीचा राजा हस्तिनापूर साम्राज्याला स्वयंवराचे आमत्रण देत नाही. तेव्हा क्रोधित होऊन भीष्म स्वयंवरात जातो व तेथील उपस्थित राजांना पराजित करून अंबा, अंबिका व अंबालिकाला घेऊन हस्तिनापूरला घेऊन येतो. मात्र अंबाने मनोमन शाल्व राजकुमाराला आपला पती मानले असल्यामुळे अंबिका व अंबालिका यांचा विवाह विचित्रवीर्यासोबत करून दिला जातो.

मात्र विवाहानंतर मूल होण्याच्या आधीच क्षय रोगाने विचित्रवीर्याचा मृत्यू होतो. तेव्हा सत्यवतीच्या आज्ञेनुसार व्यासांकडून अंबिका, अंबालिका व त्यांची एक दासी यांना अनुक्रमे धृतराष्ट्र, पांडूविदुर ही मुले होतात. धृतराष्ट्र जेष्ठ भाऊ असूनसुद्धा तो जन्मजात अंध असल्यामुळे पांडू हस्तिनापूरचा विचित्रवीर्यानंतरचा राजा बनतो.