Jump to content

दुर्योधन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यक्षगानाच्या प्रयोगामधील दुर्योधनाचे पात्र

दुर्योधन हा महाभारतातील हस्तिनापुराचा जन्मांध राजा धृतराष्ट्र व राणी गांधारी यांचा पुत्र व शंभर कौरव भावंडांपैकी सर्वांत मोठा होता.त्याला मयुरी,श्रीमती, सुचिता आणि भानुमती नावाची पत्नी व‌ लक्ष्मण नावाचा मुलगा व लक्ष्मणा नावाची मुलगी होती,जिच्याशी श्रीकृष्णा व राणी जांबवतीचा मुलगा सांब याने विवाह केला होता. तो पांडवांचा राजकीय विरोधक होता. दुर्योधन गदायुद्धात अतिशय प्रवीण होता.तो कृष्ण बंधू बलरामाचा शिष्य होता. त्याने पांडवांना मारण्यासाठी अनेक उपाय योजले. लाक्षागृहात ठेवून त्यांना जाळण्याचा त्याने प्रयत्‍न केला. भीमाला विष पाजून जीवे मारण्याचा त्याने प्रयत्‍न केला. पण त्याला कधीच यश आले नाही. शेवटी शकुनी मामाच्या साहाय्याने युधिष्ठिरास द्यूतात हरवून दुर्योधनाने पांडवांचे राज्य हिरावून घेतले. द्यूतप्रसंगात एके ठिकाणी त्याने द्रौपदीला आपली उघडी मांडी दाखवून लज्जित व अपमानित केले होते. यानंतर त्याने भर सभेमध्ये आपला बंधू दुःशासन याच्याकरवी द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्‍न केला आणि पांडवांना १२ वर्षांचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास भोगण्यास पाठविले. असे गोष्ट पण आहे जे राणी मयुरी ला दुर्योधनाची पत्नी असे म्हणतात. ती राजा वसंतराज व राणी वैशाली ह्यांची प्रथम मुलगी होती व तिला अनेक भावंड होते आणि तिला बहीण पण होती ज्यात श्वेता, लता, सुदेशनावती व इंदुमती होते. ही बायकांनी कौरावाशी लग्न केले.

पांडवांच्या अज्ञातवासाच्या काळातही दुर्योधनाने गंधर्वांकडून पांडवांना मारण्याचा बेत केला. दुर्वास मुनीना चाल करण्यास पाठवले आणि विराट राजाच्या गाई पळवून पांडवांच्या अज्ञातवासाचा भंग करण्याचा प्रयत्‍न केला. शेवटी १३ वर्षानंतर पांडवांतर्फे श्रीकृष्ण शिष्टाईसाठी आले तेव्हा "सुईच्या अग्राएवढी सुद्धा जमीन देणार नाही", असे सांगून त्यांचा उपमर्द केला. महाभारत युद्धात पराभव झाल्यावर दुर्योधन स्वाती डोहामध्ये लपून बसला. तेथे भीमाने जाऊन त्याला गदायुद्धात हरविले, त्याच्या मांडीवर आघात करून त्याची मांडी फोडली व द्यूतप्रसंगी घेतलेली आपली प्रतिज्ञा पूर्ण केली. महाभारतीय युद्धात दुर्योधन भीमाच्या हातून अखेर मारला गेला.

पांडवांची माता कुंती हिचा कानीन पुत्र कर्ण हा दुर्योधनाचा मित्र होता. दुर्योधनाने त्याला अंग देशाचा राजा बनविले होते.

दुर्योधनाचे खरे नाव दुर्योधन नसून ते सुयोधन असावे व दुर्व्यवहारामुळे ते दुर्योधन असे बदलले गेले असावे, असाही एक प्रवाद आहे.

नावाचा विग्रह

[संपादन]

दुर्योधन :
संस्कृत : दुर्जयं अस्ति योधनम् यस्मै सः तत्
अर्थ: ज्याचेशी (लढून) युद्धात जय मिळणे कठीण आहे असा जो तो.[ संदर्भ हवा ]

दुर्योधनावर लिहिलेली पुस्तके

[संपादन]
  • महाभारत आणि त्याची अनेक संस्‍करणे
  • ज्येष्ठ कौरव दुर्योधन (कादंबरी) लेखक - भास्कर महाजन
  • दुर्योधन कादंबरी : लेखक - काका विधाते. मूळ १९१४ मध्ये प्रकाशित झालेल्या कादंबरीचे २०१३साली पुनर्लेखन झाल्यावर, पृष्ठसंख्या ४००ने वाढून १०४६ झाली.

दुर्योधनाचे देऊळ

[संपादन]
  • केरळातील कोल्लम येथील दुर्योधनाचे मंदिर आहे. मंदिरात येणारे भाविक दुर्योधनाला मद्य, सुपारी, कोंबडा आणि लाल रंगाचे कपडे अर्पण करतात. येथील कौरव समाज मार्च महिन्यात दुर्योधनाच्या नावाने ‘मालाकुडा’ नावाचा सण साजरा करतात. केरळ मधील प्रसिद्ध ‘केत्तूकाझची’ परंपरा ‘मालाकुडा’ सणापासूनच सुरू झाली आहे.
  • दुर्योधनाचे दुसरे मंदिर उत्तराखंड राज्यामधील उत्तरकाशी या ठिकाणी आहे.
  • महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये दुरगाव या ठिकाणी देखील दुर्योधनाचे मंदिर आहे.