चित्रांगद
Appearance
चित्रांगद हे महाभारतातील एक पात्र आहे. तो हस्तिनापूरचा राजा शंतनू व सत्यवती यांचा मुलगा, विचित्रवीर्याचा मोठा भाऊ व भीष्माचा सावत्र भाऊ होता.
शंतनूच्या मृत्यूनंतर चित्रांगद हस्तिनापूरचा राजा बनला. त्याने हस्तिनापूरचा विस्तार वाढवला. मात्र चित्रांगद नावाच्याच एका गंधर्व राजाशी झालेल्या द्वंद्वयुद्धात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा लहान भाऊ विचित्रवीर्य राजा बनला.