परीक्षित
Jump to navigation
Jump to search
परीक्षित हा अर्जुनाचा नातू व अभिमन्यू आणि उत्तरा यांचा पुत्र होता. त्याच्या जन्माआधीच अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. परंतु श्रीकृष्णाने त्याला जीवन दिले. त्याच्या राज्यकाळात कलियुगाला सुरुवात झाली असा समज आहे. त्यानेच कलीला १)सोने २)स्त्री ३)दारू ४)जुगार ५)अभक्ष्यभक्षण या पाच जागा रहायला दिल्या होत्या. तक्षक नावाचा नाग राजा चावल्याने परीक्षिताला मरण आले. जनमेजय हा परीक्षिताचा मुलगा होता.