Jump to content

धृष्टद्युम्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चित्र:Drishtadyumna as Commander in chief of Pandava's Army.jpg

धृष्टद्युम्न द्रुपदाचा पुत्र आणि द्रौपदीशिखंडीचा भाऊ. द्रोणाचार्यांचा वध करण्यासाठी द्रुपदाने यज्ञातून या भावा-बहीणीची निर्मिती केल्याचे सांगितले जाते. महाभारतातील युद्धातात धृष्टद्युम्न पांडवसेनेचा सरसेनापती होता. द्रोणाचार्यचा वध धृष्टद्युम्नने केला.

जन्म

[संपादन]

पांचाळ देशाचा राजा द्रुपदयाने पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामी यज्ञ केला. द्रोणाचार्य यांनी द्रुपद राजास युद्धात हरवुन अर्धे राज्य घेतल्यामुळे द्रोणाचार्यचा वध करण्यास द्रुपद राजाला पुत्र हवा असतो. दोन ब्राह्मणांच्या मदतीने, द्रुपदने यज्ञ केले. यज्ञातुन सशस्त्र शक्तिशाली युवक धृष्टद्युम्न रथावर आपल्या बहीण द्रोपदसह प्रकट झाले. धृष्टद्युम्न यास पुर्वतः क्षत्रीय व धा‍र्मिक ज्ञान होते.

युद्धात

[संपादन]

आपल्या क्षत्रीय कौशल्याने आपल्या बहिणीस स्वंमवरात जिंकणाऱ्या ब्राह्मणाचे धृष्टद्युम्न पाठलाग करतो. व त्यास समजते की ब्राह्मण पांडुपुत्र अर्जुन आहे. कुरुक्षेत्रातील युद्धात, कृष्णअर्जुन यांच्या सल्ल्याने, धृष्टद्युम्नास पांडवसेनेचा सरसेनापती बनविण्यात येते.

द्रोणाचार्य वध

[संपादन]

कुरुक्षेत्रात एका क्षणी द्रोणाचार्य पांडवसेनेचा नरसंहार करीत असताना, कृष्णानी युधिष्ठिरास त्यास मारण्याची नीति सांगितली. द्रोणाचार्य जेव्हा शस्त्रधारी आहेत तेव्हा त्यांना हरवीने अशक्य होते. कृष्ण असा सल्ला देतो की द्रोणाचार्यपुत्र अश्वत्थामा याचा वध झाला आहे असे घोषित करायचे. या दुखःउपरांतच द्रोणाचार्य काही काळाखातिर आपले शस्त्र खाली टाकतील. कृष्ण युधिष्ठिरास युद्धातील नीतिमत्तेचा विजय होण्यास हे खोटे बोलणे आवश्यक असे समजावतो. पंरतु युधिष्ठिर बिचकल्याने भीम कौरवसेनेतील अश्वत्थामा नामक हत्तीचा वध करून "अश्वत्थामा मेला!, अश्वत्थामा मेला!" अशी घोषणा करतो. जेव्हा ही खबर द्रोणाचार्यला समजते ते अविश्वासाने अचंबित होतात. ही खबरची शाहनिशा करण्यासाठी द्रोणाचार्य सत्यवचनी युधिष्ठिर कडे अश्वत्थामाचा वध झाल्याची बातमी खरी आहे का म्हणुन विचारतात. तेव्हा युधिष्ठिर म्हणतात "अश्वत्थामा मरण पावला आहे" त्याच बरोबर युधिष्ठिर कुजबुजतात की "नर की हत्ती" जे द्रोणाचार्यास ऐकु येत नाही. असे म्हणले जाते की युधिष्ठिर पूर्ण वाक्य जोरात बोलले परंतु कृष्णाच्या शंखनादाने वाक्याचा शेवटचा भाग द्रोणाचार्यास ऐकु येत नाही.

मृत्यू

[संपादन]

महाभारताचे मुख्य युद्ध संपल्यानंतर, द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वथामा, कृपाचार्य व कृतवर्मा हे फक्त तिघेच कौरव सेनेत जिवंत रहातात. पांडवांनी कौरव सेनेचा पराभव केल्याचे, द्रोणाचार्य, कर्ण, दुर्योधन यांना कपट नीतीने पांडवांनी मारल्याचे शल्य अश्वथामाला डाचत असते व द्रोणाचार्य् वधाचा बदला घ्यायचा असतो. म्हणून पांडव सेना झोपलेली असताना, अश्वथामा झोपेतच धृष्टधुम्नवर हल्ला करतो व ठार मारतो. या हल्यात द्रौपदीची मुलेही अश्वथामाकडून पांडव समजून मारली जातात.