गांधारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

गांधारी ही मुळची गांधार या देशाची राजकन्या असते. गांधार देश प्राचीन काळी भारताच्या वायव्य दिशेला होता ज्याची तक्षशिला राजधानी होती. आज गांधारचा कंदहार असा अपभ्रंश झाला आहे. पितामह भीष्म धृतराष्ट्राचा गांधारीशी लग्नाचा प्रस्ताव गांधारच्या राजापुढे ठेवतात. भीष्मांचा हा प्रस्ताव गांधार राजपुत्र शकुनीला पसंत पडला नाही. गांधारीला अंधळ्या धृतराष्ट्रासाठी मागणी घालून भीष्मांनी गांधारचा अपमान केला असे त्याला आयुष्यभर वाटत राहिले. परंतु गांधारीने हा विवाहप्रस्ताव स्वखुशीने मंजूर केला व धृतराष्ट्राच्याप्रमाणेही स्वता:ला सुद्धा दृष्टीची देणगी नाकारली व आयुष्यभर डोळ्यावर पट्टी बांधून तिने आयुष्य व्यतीत केले.

गांधारी महाभारतातील १०० पुत्रांची व एका कन्येची माता होती. परंतु तिने जन्म केवळ एका मासांच्या पिंडाला दिला होता. व्यासांनी या पिंडाचे १०१ तुकडे करून ते तुपांच्या रांजणात ठेवण्यास सांगितले व १०१ कौरवांची उत्पत्ती झाली असे मानले जाते. सर्वप्रथम दुर्योधन जन्माला आला त्यानंतर दु:शासन व इतर कौरवांचा जन्म झाला. सरतेशेवटी कन्या दु:शीला चा जन्म झाला.

गांधारी ही भगवान शंकराची परमभक्त होती. कौरवांची वागणूक खलनायकाप्रमाणे असली तरी महाभारतात गांधारीची वर्तणूक अतिशय सालस व धार्मिक होती. ती नेहेमी धृतराष्ट्र व आपले पुत्र यांना राजधर्म व चांगल्या वागणूकीसाठी बोलत असे. पांडवांचे कौरवांशी कितीही टोकाचे वैर असले तरी गांधारीच्या बाबतीत परमआदर होता. द्रौपदी वस्त्रहरणाच्या सर्व कुरुसभा हीनकृत्य चालू असताना चिडीचूप होती त्यावेळेस केवळ गांधारीनेच येउन मध्यस्थी केली व निर्वेध चाललेले हीन कृत्य बंद पाडले व धृतराष्ट्राला स्त्रीच्या शापापासून होणार्‍या नुकसानाची कल्पना दिली व द्रौपदीला मान सन्मान परत मिळवून देण्याचा प्रयत्न केला.