Jump to content

आद्य शंकराचार्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आदि शंकराचार्य या पानावरून पुनर्निर्देशित)
आद्य शंकराचार्य

राजा रविवर्म्याने चितारलेले आदि शंकराचार्यांचे चित्र
जन्म इ.पू. ५०८
कालडी, केरळ, भारत
मृत्यू इ.पू. ४७६
केदारनाथ, उत्तराखंड, भारत
कार्यक्षेत्र तत्त्वज्ञान, धर्म
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा संस्कृत
तत्त्वप्रणाली अद्वैत वेदान्त
प्रादेशिक वर्गीकरण हिंदू धर्म
प्रमुख विषय अद्वैतवाद
प्रसिद्ध लिखाण शांकरभाष्य
वडील शिवगुरू
आई विशीष्टादेवी/आर्यांबा
पती लागु नाही
अपत्ये लागु नाही

आद्य शंकराचार्य किंवा आदि शंकराचार्य (मल्याळम: ആദി ശങ്കരൻ, संस्कृत: आदि शङ्करः ;) (इ.पू. ५०८ - इ.पू. ४७६) हे अद्वैत वेदान्तमताचे उद्गाते व भारतीय हिंदू धर्मीयांचे तत्त्वज्ञ होते. त्यांनी सांख्यांचा प्रधानकारणवाद आणि पूर्वमिमांसिकांचा ज्ञानकर्मसमुच्चयवाद खोडून काढत अद्वैतवाद प्रस्थापित केला आणि ज्ञानमार्गाचा पुरस्‍कार केला. इ.पू. ५०० च्या आसपास कन्याकुमारी ते काश्मीर, आणि द्वारका ते जगन्नाथपुरी असे सर्व भारतभर भ्रमण करून, त्यांनी वैदिक धर्माची पुनःस्थापना केली.[]

शंकराचार्य हे हिंदू धर्मातील सर्वोच्च आचार्य मानले जातात. आद्य शंकराचार्यांनी द्वारका मठ, जगन्‍नाथपुरी मठ, शृंगेरी मठ आणि ज्योतिर्मठ येथे चार पीठे निर्मून, त्यांवर प्रत्येकी एक पीठासीन शंकराचार्य नेमून आचार्य परंपरा घालून दिली.

या आदि शंकराचार्यांनी प्रस्थानत्रयींवर (ब्रह्मसूत्र, उपनिषदे व भगवद्गीता) आणि अन्य विषयांवर अनेक भाष्यग्रंथ लिहिले आहेत. त्यांनी तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ, संस्कृत स्तोत्रे, आणि तत्सम काव्ये रचली आहेत. त्यांच्या अनेक पद्यरचना अनुप्रासादी काव्यालंकारांनी ओथंबलेल्या आहेत.

इतिहास

[संपादन]

केरळ राज्यातील कलाडी या गावामध्ये शिवगुरू आणि आर्याम्बा या ब्राह्मण दांपत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला. आद्य शंकराचार्य हे तीन वर्षांचे असताना त्यांच्या पित्याचे निधन झाले. असे म्हणतात कि त्यांच्या वाणीवर साक्षात देवी सरस्वती विराजमान होती. त्यांच्या आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांचे पालनपोषण केले. ते त्यावेळच्या परंपरेप्रमाणे, यज्ञोपवीत उपनयन संस्कार झाल्यावर गुरुगृही अध्ययनास गेले. वयाच्या आठव्या वर्षी संन्यास घेऊन गुरूच्या शोधार्थ निघाले. चालत-चालत ते मध्यप्रदेश येथील ओंकारेश्वर येथे पोचले. तेथील श्रीगुरू गौडपाद यांचे शिष्य श्री गोविंद भगवत्पाद भट यांना त्यांनी आपले गुरू केले. त्यानंतर त्यांनी अद्वैतमताचा प्रसार करण्यासाठी भारतात पदभ्रमण सुरू केले. या यात्रेचा समारोप त्यांनी काशी विश्वनाथ येथे केला. आदी शंकराचार्यांनी 'ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या' हे तत्त्वज्ञान मांडले. त्यांनी शैववैष्णव हा वाद संपवण्याचे एक मोठे काम केले.त्यांनी चार पीठ स्थापन केले. आद्यगुरु वयाच्या 32 व्या वर्षी परमातम्यात विलीन झाले.[]

आदी शंकराचार्यांचे लिखित साहित्य

[संपादन]

आद्य शंकराचार्यांनी लिहिलेली उपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रांवरील भाष्ये जगप्रसिद्ध आहेत. आद्य शंकराचर्यांनी आपल्या 'मठाम्नाय' या ग्रंथात, भारतातील दशनामी संन्यास प्रणाली, चारही मठ, दशनामी आखाडे व त्यांच्या आधाराने चालणारे कुंभपर्व या बाबतच्या नीती,रीती व नियम, विधान व सिद्धांत यांचे विवेचन केले आहे.[]

  • भाष्ये -
    • ईशोपनिषद भाष्य
    • ऐतरोपनिषद भाष्य
    • कठोपनिषद भाष्य
    • केनोपनिषद भाष्य
    • छांदोग्योपनिषद भाष्य
    • तैत्तिरीयोपनिषद भाष्य
    • प्रश्नोपनिषद भाष्य
    • बृहदारण्यकोपनिषद भाष्य
    • ब्रह्मसूत्र भाष्य
    • भगवद्गीता भाष्य
    • मंडूकोपनिषद कारिका भाष्य
    • मुंडकोपनिषद भाष्य
    • विष्णूसहस्रनाम स्तोत्र भाष्य
    • सनत्‌सुजातीय भाष्य
  • अष्टोत्तरसहस्रनामावलिः
  • उपदेशसहस्री
  • चर्पटपंजरिकास्तोत्रम्‌
  • तत्त्वविवेकाख्यम्
  • दत्तात्रेयस्तोत्रम्‌
  • द्वादशपंजरिकास्तोत्रम्‌
  • पंचदशी
    • कूटस्थदीप.
    • चित्रदीप
    • तत्त्वविवेक
    • तृप्तिदीप
    • द्वैतविवेक
    • ध्यानदीप
    • नाटक दीप
    • पञ्चकोशविवेक
    • पञ्चमहाभूतविवेक
    • पञ्चकोशविवेक
    • ब्रह्मानन्दे अद्वैतानन्द
    • ब्रह्मानन्दे आत्मानन्द
    • ब्रह्मानन्दे योगानन्द
    • महावाक्यविवेक
    • विद्यानन्द
    • विषयानन्द
  • परापूजास्तोत्रम्‌
  • प्रपंचसार
  • भवान्यष्टकम्‌
  • लघुवाक्यवृत्ती
  • विवेकचूडामणि
  • सर्व वेदान्त सिद्धान्त सार संग्रह
  • साधनपंचकम

छोट्या तत्त्वज्ञानविषक रचना (कंसात श्लोकसंख्या/ओवीसंख्या)

[संपादन]
  • अद्वैत अनुभूति (८४)
  • अद्वैत पंचकम्‌ (५)
  • अनात्मा श्रीविगर्हण (१८)
  • अपरोक्षानुभूति (१४४)
  • उपदेश पंचकम्‌ किंवा साधन पंचकम्‌ (५)
  • एकश्लोकी (१)
  • कौपीनपंचकम्‌ (५)
  • जीवनमुक्त आनंदलहरी (१७)
  • तत्त्वोपदेश(८७)
  • धन्याष्टकम्‌ (८)
  • निर्वाण मंजरी (१२)
  • निर्वाणशतकम्‌ (६)
  • पंचीकरणम्‌ (गद्य)
  • प्रबोध सुधाकर (२५७)
  • प्रश्नोत्तर रत्‍नमालिका (६७)
  • प्रौढ अनुभूति (१७)
  • यति पंचकम्‌ (५)
  • योग तरावली(?) (२९)
  • वाक्यवृत्ति (५३)
  • शतश्लोकी (१००)
  • सदाचार अनुसंधानम्‌ (५५)
  • साधन पंचकम्‌ किंवा उपदेश पंचकम्‌ (५)
  • स्वरूपानुसंधान अष्टकम्‌ (९)
  • स्वात्म निरूपणम्‌ (१५३)
  • स्वात्मप्रकाशिका (६८)
गणेश स्तुतिपर
  • गणेश पंचरत्‍नम्‌ (५)
  • गणेश भुजांगम्‌ (९)
शिवस्तुतिपर
  • कालभैरव अष्टकम्‌ (१०)
  • दशश्लोकी स्तुति (१०)
  • दक्षिणमूर्ति अष्टकम्‌ (१०)
  • दक्षिणमूर्ति स्तोत्रम्‌ (१९)
  • दक्षिणमूर्ति वर्णमाला स्तोत्रम्‌ (१३)
  • मृत्युंजय मानसिक पूजा (४६)
  • वेदसार शिव स्तोत्रम्‌ (११)
  • शिव अपराधक्षमापन स्तोत्रम्‌ (१७)
  • शिव आनंदलहरी (१००)
  • शिव केशादिपादान्तवर्णन स्तोत्रम्‌ (२९)
  • शिव नामावलि अष्टकम्‌ (९)
  • शिव पंचाक्षर स्तोत्रम्‌ (६)
  • शिव पंचाक्षरा नक्षत्रमालास्तोत्रम्‌ (२८)
  • शिव पादादिकेशान्तवर्णनस्तोत्रम्‌ (४१)
  • शिव भुजांगम्‌ (४)
  • शिव मानस पूजा(५)
  • सुवर्णमाला स्तुति (५०)
शक्तिस्तुतिपर
  • अन्‍नपूर्णा अष्टकम्‌ (८)
  • आनंदलहरी
  • कनकधारा स्तोत्रम्‌ (१८)
  • कल्याण वृष्टिस्तव (१६)
  • गौरी दशकम्‌ (११)
  • त्रिपुरसुंदरी अष्टकम्‌ (८)
  • त्रिपुरसुंदरी मानस पूजा (१२७)
  • त्रिपुरसुंदरी वेद पाद स्तोत्रम्‌ (१०)
  • देवी चतुःषष्ठी उपचार पूजा स्तोत्रम्‌ (७२)
  • देवी भुजांगम्‌ (२८)
  • नवरत्‍न मालिका (१०)
  • भवानी भुजांगम्‌ (१७)
  • भ्रमरांबा अष्टकम्‌ (९)
  • मंत्रमातृका पुष्पमालास्तव (१७)
  • महिषासुरमर्दिनी स्तोत्रम्‌
  • ललिता पंचरत्नम्‌ (६)
  • शारदा भुजंगप्रयात स्तोत्रम्‌ (८)
  • सौंदर्यलहरी (१००)
विष्णू आणि त्याच्या अवतारांच्या स्तुतिपर
  • अच्युताष्टकम्‌ (९)
  • कृष्णाष्टकम्‌ (८)
  • गोविंदाष्टकम्‌ (९)
  • जगन्‍नाथाष्टकम्‌ (८)
  • पांडुरंगाष्टकम्‌ (९)
  • भगवन्‌ मानस पूजा (१०)
  • मोहमुद्‌गार (भज गोविंदम्‌) (३१)
  • राम भुजंगप्रयात स्तोत्रम्‌ (२९)
  • लक्ष्मीनृसिंह करावलंब (करुणरस) स्तोत्रम्‌ (१७)
  • लक्ष्मीनरसिंह पंचरत्‍नम्‌ (५)
  • विष्णूपादादिकेशान्त स्तोत्रम्‌ (५२)
  • विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम्‌ (१४)
  • षट्‌पदीस्तोत्रम्‌ (७)
इतर देवतांच्या आणि तीर्थांच्या स्तुतिपर
  • अर्धनारीश्वरस्तोत्रम्‌ (९)
  • उमा महेश्वर स्तोत्रम्‌ (१३)
  • काशी पंचकम्‌ (५)
  • गंगाष्टकम्‌ (९)
  • गुरू अष्टकम्‌ (१०)
  • नर्मदाष्टकम्‌ (९)
  • निर्गुण मानस पूजा (३३)
  • मनकर्णिका अष्टकम्‌ (९)
  • यमुनाष्टकम्‌ (८)
  • यमुनाष्टकम्‌-२ (९)

शंकराचार्यांवरील वा त्यांच्या लिखाणावरील पुस्तके

[संपादन]
  • आद्य शंकराचार्य (लेखक - अविनाश महादेव नगरकर)
  • आद्यशंकराचार्य (शांता कुळहळ‌्ळ‌ी )
  • आद्य शंकराचार्य (संध्या शिरवाडकर)
  • जगद्‌गुरू श्रीमत्‌ शंकराचार्य (मूळ हिंदी चरित्र; लेखक - पंडित दीनदयाळ उपाध्याय; मराठी अनुवाद - लक्ष्मण टोपले; प्रकाशक - मोरया प्रकाशन, पुणे)
  • द्वादश- रत्नमाला (शंकराचार्यांच्या बारा स्तोत्रांवर आधारित सुलभ विवेचन, लेखक - ह.भी. चिकेरूर )
  • पुनरुत्थान (कादंबरी, डाॅ. सच्चिदानंद शेवडे) - ढवळे प्रकाशन
  • भज गोविन्दम् (सुधा चांदोरकर)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "आदि शंकराचार्य के जन्म के बारे में फैला भ्रम, जानिए सचाई". 2021-01-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित. १४ जून २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ प्रा. भालचंद्र माधवराव हरदास. "आदी शंकराचार्य,मठाम्नाय महानुशासन आणि कुंभपरंपरा". २४-१२-२०१८ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]
  3. ^ प्रा. भालचंद्र माधवराव हरदास. तरुण भारत नागपूर, आसमंत पुरवणी, पान २ "आदी शंकराचार्य,मठाम्नाय महानुशासन आणि कुंभपरंपरा" Check |दुवा= value (सहाय्य). २४-१२-२०१८ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]

बाह्य दुवे

[संपादन]