दुःशला
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
दुःशला ही धृतराष्ट्र व गांधारी यांची कन्या होती व १०० कौरवांची एकमेव बहीण होती. हिचा विवाह सिंधु, शिबि व सौवीर देशांचा राजा वृद्धक्षत्र याचा पुत्र जयद्रथ ह्याच्याशी झाला होता. या दांपत्याच्या अनेक पुत्रांमध्ये सुरथ नावाचा एक पुत्र होता.
युधिष्ठिराने जेव्हा अश्वमेध यज्ञ केला, तेव्हा अर्जुन यज्ञाच्या अश्वासह सिंधुदेशाला गेला होता. तेव्हा अर्जुनाने केलेल्या आपल्या पित्याचा(जयद्रथाचा) वध आठवून हा सुरथ भयभीत झाला आणि त्या भीतीनेच त्याचा प्राण गेला. तेव्हा कृष्णाने त्याच्यावर उपचार करून त्याला परत जिवंत केले. त्यानंतर सुरथ हा धर्मराजाच्या(युधिष्ठिराच्या) अश्वमेधसमारंभात उपस्थित राहिला होता.