डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बिंदू चौक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बिंंदू चौक, कोल्हापूर
कोल्हापुरातील बिंंदू चौक येथील म. जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्ध पुतळे, व मध्यभागी शहीद स्तंभ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा हा कोल्हापुरातील बिंंदू चौक येथील एक ऐतिहासिक अर्धाकृती पुतळा आहे. जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक-एक पुतळे ९ डिसेंबर १९५० रोजी बिंंदू चौकात बसवण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते भाई माधवराव बागल हे या पुतळा समितीचे अध्यक्ष होते. हा पुतळा आंबेडकरांच्या हयातीत उभारण्यात आलेला असून तो त्यांचा जगातील पहिला पुतळा आहे. शिल्पकार बाळ चव्हाण यांनी हा पुतळा बनवलेला आहे. तत्कालीन नगराध्यक्ष द.मा. साळोखे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रतिमा समितीकडून नगरपालिकेस करवीर जनतेच्यावतीने तो प्रदान करण्यात आला. आंबेडकरवाद्यांसाठी बिंदू चौक हे आदराचे आणि महत्त्वपूर्ण ठिकाण बनले आहे. पुतळा उभारल्यानंतर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी या आपल्या स्वतःच्या पुतळ्याला भेट दिलेली आहे. १७ ऑक्टोबर १९६० रोजी चौकात हुतात्मा स्तंभ उभारण्यात आला, ज्यावर भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील २० हुतात्म्यांची नावे कोरलेली आहेत. दरवर्षी अनेक आंबेडकरवादी लोक कोल्हापुरातील माणगाव आणि बिंदू चौक येथे भेटी देतात. विविध सार्वजनिक व सामाजिक सभांचे आयोजन या ठिकाणी होत असते.[१][२][३][४]

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]