Jump to content

आंबेडकर शिक्षण पुरस्‍कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आंबेडकर शिक्षा पुरस्‍कार या पानावरून पुनर्निर्देशित)

आंबेडकर शिक्षण पुरस्कार (हिंदी: आंबेडकर शिक्षा पुरस्‍कार) हा राजस्थान सरकार द्वारा दिला जाणारा पुरस्कार आहे. राजस्थान सरकार अनुसूचित जातीअनुसूचित जमातींचा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकास करून त्यांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रीय विचारधेच्या अंतर्गत मागासलेल्या लोकांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात मुख्य प्रवाहात समर्पित केले. राजस्थान सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमधील प्रेरणा घेऊन १४ एप्रिल २००५ रोजी त्यांच्या जयंतीच्या दिवशी, राज्यातील सामाजिक सेवा, शिक्षण, महिला सुधारणा आणि न्याय या क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना दरवर्षी आंबेडकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यासाठी खालील पुरस्कारांची सुरुवात केली होती[]:-


आंबेडकर शिक्षण पुरस्‍कार

राजस्थानचे माध्यमिक शिक्षण मंडळ, अजमेरचे वर्ग १० वी आणि १२ वी च्या परीक्षांमध्ये कला, विज्ञान आणि वाणिज्य विभागांमध्ये अनुसूचित जाति आणि अनुसूचित जमाती श्रेणीतील सर्वोच्च स्थान प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी रुपये ५१ हजार आणि प्रशस्ति पत्राने सन्मानित केले जाते. अशा प्रकारे या श्रेणीमध्ये दरवर्षी ८ पुरस्कार दिले जातात.

पुरस्काराचे स्वरूप

[संपादन]

पुरस्कारासाठी निवड झालेल्या व्‍यक्ती किंवा संस्‍थेला ५१,००० (५१ हजार) रुपये व प्रशस्ती पत्रक देऊन सम्‍मानित करण्यात येते.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]