२०२१ नामिबिया तिरंगी मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२१ नामिबिया तिरंगी मालिका
२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन याचा भाग
दिनांक २६ नोव्हेंबर - ६ डिसेंबर २०२१
स्थळ नामिबिया नामिबिया
निकाल दोन सामने झाले, उर्वरीत स्थगित
संघ
नामिबियाचा ध्वज नामिबिया ओमानचा ध्वज ओमान संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
संघनायक
जेजे स्मिट झीशान मकसूद अहमद रझा
सर्वात जास्त धावा
जेजे स्मिट (१५०) आयान खान (९२) -
सर्वात जास्त बळी
जेजे स्मिट (७)
रुबेन ट्रम्पलमान (७)
झीशान मकसूद (६) -

२०२१ नामिबिया तिरंगी मालिका ही २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन या स्पर्धेची आठवी फेरी नामिबियामध्ये २६ नोव्हेंबर - ६ डिसेंबर २०२१ दरम्यान आयोजित केली होती. सदर मालिका २०२३ क्रिकेट विश्वचषकसाठी पात्रता निश्चित ठरविणाऱ्या २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन या स्पर्धेअंतर्गत खेळविण्यात आली. यजमान नामिबियासह संयुक्त अरब अमिराती आणि ओमान या देशांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला होता. ओमानमध्ये झालेल्या चौथ्या फेरीमधील दोन न खेळलेले गेलेले सामने या फेरीमध्ये खेळवले गेले. सदर दोन सामने ओमानचे सुल्तान यांच्या निधनामुळे पुढे ढकलण्यात आले होते. स्पर्धेपूर्वी नियमित कर्णधार गेरहार्ड इरास्मुस दुखापतग्रस्त असल्याने त्याच्याजागी नामिबियाच्या कर्णधारपदी जेजे स्मिटची नियुक्ती करण्यात आली. सर्व सामने हे विन्डहोक मधील वॉन्डरर्स क्रिकेट मैदान येथे झाले.

नामिबिया आणि ओमान या दोन्ही संघांनी एक-एक सामने जिंकले. परंतु २७ नोव्हेंबर रोजी कोरोनाव्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे उर्वरीत सहा सामने पुढे ढकलण्यात आले. पुढे ढकलण्यात आलेल्या ओमान आणि संयुक्त अरब अमिराती या दोन संघांमधील तीन सामने फेब्रुवारी २०२२ मध्ये द्विपक्षीय मालिका आयोजित करून खेळवले गेले.

सामने[संपादन]

झालेले सामने[संपादन]

१ला सामना[संपादन]

२६ नोव्हेंबर २०२१
०९:३०
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
२२८ (५० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
१८८ (४६.५ षटके)
जेजे स्मिट ५६ (६०)
झीशान मकसूद ३/३० (१० षटके)
झीशान मकसूद ५८ (९०)
जेजे स्मिट ५/२६ (९ षटके)
नामिबिया ४० धावांनी विजयी.
वॉन्डरर्स क्रिकेट मैदान, विन्डहोक
पंच: शॉन जॉर्ज (द.आ.) आणि अँड्रु लोव (ना)
सामनावीर: जेजे स्मिट (नामिबिया)


२रा सामना[संपादन]

२७ नोव्हेंबर २०२१
०९:३०
धावफलक
ओमान Flag of ओमान
२९१/९ (५० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
२८२/९ (५० षटके)
आयान खान ८३ (९३)
रुबेन ट्रम्पलमान ५/७६ (१० षटके)
जेजे स्मिट ९४ (७२)
झीशान मकसूद ३/४५ (८ षटके)
ओमान ९ धावांनी विजयी.
वॉन्डरर्स क्रिकेट मैदान, विन्डहोक
पंच: शॉन जॉर्ज (द.आ.) आणि क्लॉडे थॉर्नबर्न (ना)
सामनावीर: आयान खान (ओमान)

स्थगित सामने[संपादन]

३रा सामना[संपादन]


४था सामना[संपादन]

५वा सामना[संपादन]

६वा सामना[संपादन]

७वा सामना[संपादन]

५ डिसेंबर २०२१
०९:३०
धावफलक
वि


८वा सामना[संपादन]