मडिकेरी
मडिकेरी
मेर्करा | |
---|---|
मोठे गाव | |
लुआ(Lua) त्रुटी विभाग:Location_map मध्ये 502 ओळीत: Unable to find the specified location map definition. Neither "Module:Location map/data/India Karnataka" nor "Template:Location map India Karnataka" exists. | |
गुणक: 12°25′15″N 75°44′23″E / 12.4209°N 75.7397°Eगुणक: 12°25′15″N 75°44′23″E / 12.4209°N 75.7397°E | |
देश | भारत |
राज्य | कर्नाटक |
जिल्हा | कोडगु |
क्षेत्र | कुर्ग, मलनाड |
Elevation | १,१५० m (३,७७० ft) |
लोकसंख्या (2011) | |
• एकूण | ३३,३८१ |
• लोकसंख्येची घनता | एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै) |
भाषा | |
• अधिकृत | कन्नड |
Time zone | UTC+5:30 (IST) |
PIN |
५७१ २०१ |
टेलिफोन कोड | ०८ २७२ |
Vehicle registration | KA-१२ |
संकेतस्थळ |
www |
मडिकेरी (याचे पूर्वीचे नाव मेर्करा होते) भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे. हे एक थंड हवेचे ठिकाण आहे. हे शहर कोडागु जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
व्युत्पत्ती
[संपादन]मडिकेरी पूर्वी मुद्दू राजा केरी म्हणून ओळखले जात असे. याचा अर्थ मुद्दुराजाचे शहर असा होतो.[१] इ.स. १६३३ ते १६८७ दरम्यान कोडागूवर राज्य करणाऱ्या प्रख्यात हलेरी राजा मुद्दुराजा यांच्या नावावरून या गावाला हे नाव देण्यात आले आहे. इ.स. १८३४ पासून, जुलमी ब्रिटिश राजवटी दरम्यान, याचे नाव मेर्करा असे ठेवण्यात आले. स्वातंत्र्यानंतर त्याचे नाव म्हैसूर सरकारने मडिकेरी असे ठेवले.
इतिहास
[संपादन]मडिकेरीचा इतिहास कोडगूच्या इतिहासाशी संबंधित आहे. इ.स. दुसऱ्या ते सहाव्या शतकापर्यंत कोडगूच्या उत्तर भागावर कादंबस राजवंश राज्य करीत होते. कोडगूच्या दक्षिणेकडील भागावर चौथ्या ते अकराव्या शतकापर्यंत गंगास राजवंशाने राज्य केले. ११ व्या शतकात गंगास राजवंशाला पराभूत केल्यानंतर चोलास राजे कोडगूचे राज्यकर्ते बनले. १२ व्या शतकात चोलास राजे होयसलास कडून पराभूत झाले आणि कोडगूवर होयसलास राजवंशाचे राज्य आले. १४ व्या शतकात कोडगु विजयनगर राजांकडे आला. त्यांच्या पतनानंतर, कर्णमभु (पालेगार) सारख्या स्थानिक सरदारांनी थेट त्यांच्या प्रदेशांवर राज्य करण्यास सुरुवात केली. त्यांचा हलेरी राजवंश संस्थापक वीरराजूंनी पराभव केला. हे इककेरी सदाशिवा नायक यांचे पुतणे जे तालकडु गंगा राजवंशाचे वंशज होते. इ.स. १७०० मध्ये केकेरी सोमशेखर नायक यांनी तुल्यनाडूच्या पुट्टूर आणि अमारा सुलिया मॅग्नेस हलेरी राजांना भेट दिली. हलेरी राजवंश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वीरराजूच्या वंशजांनी कोडगुवर इ.स. १६०० ते १८३४ पर्यंत राज्य केले. हलेरी राजा मुद्दुराजाने मडीकेरी येथे किल्ला बांधला आणि त्यांची राजधानी म्हणून घोषित केली.[२] मुद्दुराजा हे हलेरी राजवंशातला तिसरे राजा होते. त्यांनी मडिकेरीच्या भोवतालची जमीन सपाट करण्यास सुरुवात केली आणि इ.स. १८८१ मध्ये किल्ला बांधला. मडीकेरी किल्ला जो मूळतः चिखलाने बांधलेला होता. नंतर ती जागा टीपू सुलतान याने जिंकली. इ.स. १८३४ नंतर कोडगुवर ब्रिटिशांची जुलमी राजवट चालु झाली. इ.स. १९४७ नंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर हा भाग भारतात शामिल झाला.[३]
लोकसंख्याशास्त्र
[संपादन]२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार मडीकेरीची लोकसंख्या ३३,३८१ होती.[४] यात पुरुषांची टक्केवारी ५७.२% आणि महिलांची टक्केवारी ४२.८% आहे. मडीकेरीचा सरासरी साक्षरता दर ८५% होता, जो राष्ट्रीय सरासरी प्रमाण ५७.२%च्या तुलनेत जास्त होती. पुरुष साक्षरता ८३% आणि महिला साक्षरता ८०% होती. ११% लोकसंख्या ६ वर्षाखालील होती.
भूगोल आणि हवामान
[संपादन]हे शहर समुद्र सपाटीपासून १,१५० मीटर (३,७७० फूट) उंचीवर आहे. येथे उष्णकटिबंधीय डोंगराळ प्रदेशाचे हवामान आहे. मडीकेरी 12°25′N 75°44′E / 12.42°N 75.73°E येथे स्थित आहे.[५][६] मडिकेरी पश्चिम घाटात स्थित आहे आणि एक लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे. उत्तरेस हसन, पश्चिमेला मंगलुरु आणि पूर्वेस मयसूरू ही सर्वात जवळची शहरे आहेत. जानेवारीत सरासरी दैनंदिन किमान तापमान ११ सेल्सियस असते. उन्हाळ्यात कमाल तापमान २४ अंश सेल्सियस ते २७ अंश सेल्सियस पर्यंत असते.[७] नैऋत्य मॉन्सूनला सुरुवात झाल्यानंतर तापमानात जूनमध्ये घट होते आणि हवामान थंड होते. ४.५ अंश सेल्सियस हे सर्वात कमी नोंदविले तापमान आहे.
संदर्भ
[संपादन]- ^ Coorg History Archived 2009-04-26 at the Wayback Machine.
- ^ Puttur Anantharaja Gowda (2015). IN PURSUIT OF OUR ROOTS.
- ^ Jerry Dupont, The Common Law Abroad, Wm. S. Hein Publishing, 2001, आयएसबीएन 0-8377-3125-9, from p 592
- ^ "Census of India 2001: Data from the 2001 Census, including cities, villages and towns (Provisional)". Census Commission of India. 2004-06-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-11-01 रोजी पाहिले.
- ^ Madikeri, FallingRain.com
- ^ "Maps, Weather, and Airports for Madikeri, India". www.fallingrain.com.
- ^ Ground Water Information Booklet, Ministry of Water Resources, 2007. Retrieved 23 June 2011.
बह्यदुवे
[संपादन]- साचा:Wikivoyage-inline
- Madikeri.org: मडिकेरी आणि कुर्गचे पोर्टल Archived 2010-12-04 at the Wayback Machine.
- मडिकेरी: इतिहास आणि आर्किटेक्चर Archived 2016-08-26 at the Wayback Machine.