शिरपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
शिरपूर
जिल्हा धुळे जिल्हा
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या (शहर) ३,३७,५५३
(२००१)
दूरध्वनी संकेतांक ०२५६३
टपाल संकेतांक ४२५-४०५
वाहन संकेतांक MH-18
संकेतस्थळ http://www.nagarpalika.net/Default.aspx


महाराष्ट्र राज्यात अगदी उत्तरेस असलेल्या धुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागात शिरपूर हा एक तालुका आहे. शिरपूर शहर हे तालुक्याचे मुख्यालय आहे. या शहरात राहणाऱ्या जनतेच्या सर्व मूलभूत गरजा भागतात आणि त्यांना जरूर त्या सोईसुविधा प्राप्त होतात.

शिक्षण क्षेत्रात शिरपूर शहर बऱ्यापैकी आघाडीवर असून गावात चांगल्या शिक्षणसंस्था आहेत..
गावात औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकीच्या उच्च शिक्षणाच्या सोयीदेखील आहेत.
शिरपूर गावात दोन प्रसिद्ध बालाजी (प्रतितिरुपती) मंदिरे असून खालच्या गावातील व वरच्या गावातील अशा नावाने ती ओळखली जातात, श्री तिरुपती बालाजी नावाने व दरवर्षी खंडेराव देवाच्या नावाने यात्रा भरते.
शहरांत प्रभु व्यंकटेश बालाजी मंदिर, पाताळेश्वर मंदिर, खंडेराव मंदिर, माताभवानी मंदिर, अशी मंदिरे असून तीन मशिदी आहेत.

शिरपूर हे गाव प्रसिद्ध हिंदी व मराठी अभिनेत्री स्मिता पाटील हिचे जन्मगाव आहे.

बाह्य दुवे[संपादन]

शिरपूर हे प्रसिद्ध आहे ते येथे सुरू असलेल्या पाणी अडवा पाणी जिरवा ह्या कामांमुळे. ह्या कामांना मुळे "शिरपूर पँटर्न" म्हणून आेळख मिळाली.तसेच श्री. मनाेहर पांडुरंग वाघ यांचा http://shirpurbrc.blogspot.in/,हा महत्वपूर्ण ब्लॉग आहे,श्री.मनोहर वाघ यांना गुगलकडून सात गुगल गाईड नामांकने मिळाली आहेत. शिरपूर तालुक्यात व जिल्ह्यात श्री.मनोहर वाघ यांना तंत्रस्नेही साधनव्यक्ती म्हणून ओळखतात, यासाठी त्यांनी अनेक स्थळे गुगल नकाशात जोडली आहेत व त्यांचे यू ट्यूब चॅनल आहे.अध्यपनात तंत्रज्ञाना चा वापर यावरती ते कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करतात.