ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९८२-८३
Appearance
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९८२-८३ | |||||
श्रीलंका | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | १३ – ३० एप्रिल १९८३ | ||||
संघनायक | दुलिप मेंडीस | ग्रेग चॅपल | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | श्रीलंका संघाने ४-सामन्यांची मालिका २–० जिंकली |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने एप्रिल १९८३ मध्ये एकमेव कसोटी सामना आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाचा हा श्रीलंकेचा पहिला अधिकृत दौरा होता. या आधी अनेकवेळा ऑस्ट्रेलियन संघ श्रीलंकेत प्रथम-श्रेणी सामने खेळण्यासाठी दौरे केले होते. एकमेव कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला तर एकदिवसीय मालिका श्रीलंकेने २-० ने जिंकत पहिला वहिला एकदिवसीय मालिका विजय नोंदविला.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन] १३ एप्रिल १९८३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- ४५ षटकांचा सामना.
- श्रीलंकेत ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने ऑस्ट्रेलियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- रॉजर वूली (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन]३रा सामना
[संपादन] २९ एप्रिल १९८३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे उर्वरीत खेळ होऊ शकला नाही.
- ४५ षटकांचा सामना.
४था सामना
[संपादन] ३० एप्रिल १९८३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ३० षटकांचा करण्यात आला. परंतु ऑस्ट्रेलियाच्या डावादरम्यान पुन्हा पाऊस आल्याने १९.२ षटकांचा खेळ झाल्यावर सामना रद्द करण्यात आला.
- ग्रॅनव्हिल डि सिल्वा आणि ब्रेन्डन कुरुप्पु (श्री) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
कसोटी मालिका
[संपादन]एकमेव कसोटी
[संपादन]२२-२६ एप्रिल १९८३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेत पहिली कसोटी खेळली.
- श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमधला पहिला कसोटी सामना.
- कसोटीत ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर पहिला विजय.
- रोशन गुणरत्ने (श्री), रॉजर वूली आणि टॉम होगन (ऑ) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.