इ.स. १९१८
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १८९० चे - १९०० चे - १९१० चे - १९२० चे - १९३० चे |
वर्षे: | १९१५ - १९१६ - १९१७ - १९१८ - १९१९ - १९२० - १९२१ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- फेब्रुवारी १४ - एडगर राइस बरोच्या टारझनवरील पहिला सिनेमा प्रदर्शित झाला.
- फेब्रुवारी १६ - लिथुएनियाने रशिया व जर्मनीपासून स्वातंत्र्य जाहीर केले.
- फेब्रुवारी २४ - एस्टोनियाने रशिया पासून स्वातंत्र्य जाहीर केले.
- मार्च १ - जर्मन पाणबुडीने रॅथलिन बेटाजवळ ईंग्लंडचे एच.एस.एस. कॅल्गारियन हे जहाज बुडवले.
- मार्च ३ - पहिले महायुद्ध - ब्रेस्ट-लिटोव्स्कचा तह - युद्धातील रशियाचा सहभाग समाप्त. फिनलंड, लात्व्हिया, एस्टोनिया, पोलंड व लिथुएनियाच्या स्वतंत्र अस्तित्वाला मान्यता.
- मार्च ७ - पहिले महायुद्ध - फिनलंडने जर्मनीशी संधी केली.
- एप्रिल २१ - पहिले महायुद्ध - जर्मनीच्या रेड बेरोन नावाने ओळखला जाणाऱ्या लढाउ वैमानिक मॅन्फ्रेड फोन रिक्टोफेनचा लढाईत अंत.
- मे २ - जनरल मोटर्सने डेलावेरमधील शेवरोले मोटर कंपनी विकत घेतली.
- मे १५ - फिनलंडचे गृहयुद्ध समाप्त.
- मे १६ - अमेरिकेत सरकारवर टीका करणे हा तुरुंगवासास पात्र गुन्हा ठरवण्यात आला.
- जून ६ - पहिले महायुद्ध - बेलेउ वूडची लढाई.
- जुलै १७ - रशियाचा झार निकोलस दुसरा व त्याच्या कुटुंबाची हत्या.
- ऑगस्ट ८ - पहिले महायुद्ध-अमियेन्सची लढाई - दोस्त राष्ट्रांची जर्मनीविरुद्ध आगेकूच.
- डिसेंबर २७ - बृहद् पोलंड(ग्रांड डची ऑफ पोझ्नान)मध्ये पोलिश लोकांचे जर्मन सत्तेविरूद्ध बंड.
जन्म
[संपादन]- फेब्रुवारी २२ - रॉबर्ट वाडलो, ८ फूट ११ ईंच (२७२ से.मी.) उंचीचा जगातील सगळ्यात उंच पुरूष.
- मार्च १ - होआव गुलार्ट, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
- मार्च ११ - अल् इबेन, फिलाडेल्फियाचा अभिनेता.
- मे २३ - डेनिस कॉम्प्टन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- जुलै १७ - कार्लोस मनुएल अराना ओसोरिया, ग्वाटेमालाचा राष्ट्राध्यक्ष.
- जुलै १८ - नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- जुलै २२ - गोपाळराव बळवंतराव कांबळे, मराठी चित्रकार.
- नोव्हेंबर १ - शरद तळवलकर, मराठी चित्रपटअभिनेते.
- डिसेंबर १४ - बी.के.एस.आय्यंगार, भारतीय योगतज्ञ.
- डिसेंबर २३ - हेल्मुट श्मिट, जर्मनीचा चान्सेलर.
मृत्यू
[संपादन]- फेब्रुवारी ६ - गुस्टाफ क्लिम्ट, ऑस्ट्रियन चित्रकार.
- फेब्रुवारी १० - दुसरा अब्दुल हमीद, ओस्मानी सम्राट.
- एप्रिल २१ - मॅन्फ्रेड फोन रिक्टोफेन, जर्मन लढाऊ वैमानिक.
- जुलै ३ - महमद पाचवा, ओट्टोमन सम्राट.
- जुलै १७ - निकोलस दुसरा, रशियाचा झार (कुटुंबासह).
- सप्टेंबर १२ - जॉर्ज रीड, ऑस्ट्रेलियाचा चौथा पंतप्रधान.
- ऑक्टोबर ५ - रोलॉॅं गॅरो, फ्रेंच वैमानिक.
- ऑक्टोबर १५ - श्री संत साईबाबा, शिर्डीचे संत.