मिसिसिपी नदी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| मिसिसिपी नदी | |
मेम्फिसमधील मिसिसिपी नदीवरील एक पूल |
|
| उगम | इटास्का सरोवर, मिनेसोटा ४५० मी. |
| मुख | मेक्सिकोचे आखात |
| लांबी | ३,७३० किमी (२,३२० मैल) कि.मी. |
| देश | मिनेसोटा, विस्कॉन्सिन, इलिनॉय, केंटकी, टेनेसी व मिसिसिपी, आयोवा, मिसूरी, आर्कान्सा व लुईझियाना |
| उपनद्या | मिनेसोटा नदी, मिसूरी नदी, ओहायो नदी, आर्कान्सा नदी, इलिनॉय नदी, टेनेसी नदी |
| पाणलोट क्षेत्र | २९,८१,०७६ किमी² |
मिसिसिपी नदी (इंग्रजी: Mississippi River) ही उत्तर अमेरिका खंडातील सर्वात मोठी नदी आहे. मिसिसिपी नदीचा उगम मिनेसोटा राज्यातील इटास्का सरोवरामध्ये होतो. येथून ही नदी दक्षिण दिशेला ३,७३० किमी (२,३२० मैल) वाहते व लुईझियानातील न्यू ऑर्लिन्स शहराच्या १५३ किमी दक्षिणेला मेक्सिकोच्या आखाताला मिळते. ही नदी मिनेसोटा व लुईझियाना ह्या राज्यांमधून वाहते तर विस्कॉन्सिन, इलिनॉय, केंटकी, टेनेसी व मिसिसिपी ह्या राज्यांच्या पश्चिम सीमा व आयोवा, मिसूरी व आर्कान्सा ह्या राज्यांच्या पूर्व सीमा मिसिसिपी नदीने आखल्या गेल्या आहेत.
मिसिसिपी ही लांबीने जगातील चौथ्या क्रमांकाची नदी आहे. मिसूरी व ओहायो ह्या दोन मिसिसिपीच्या सर्वात मोठ्या उपनद्या आहेत.
[संपादन] मोठी शहरे
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |