बाबर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बाबर

झहिर उद्दिन मोहम्मद बाबर (फेब्रुवारी २३, इ.स. १४८३ - जानेवारी ५, इ.स. १५३१) हा मुघल साम्राज्याचा संस्थापक होता.

अनुक्रमणिका

बालपण [संपादन]

बाबरचा जन्म १४ फेब्रुवारी १४८३ रोजी मध्य आशियातील फरगाना खोऱ्यामधील (वर्तमानकालीन उझबेकिस्तानात) आंदिजान शहरात झाला. बाबरच्या वडिलांचे नाव उमरशेख मिर्झा होते. उमरशेख मिर्झा पराक्रमी तुर्क सम्राट तैमूरलंग याचा पाचवा वारस होता. बाबराच्या आईचे नाव कुल्लघ निगार खानुम होते. बाबरची आई ही मुघल सम्राट चंगीझ खान याच्या वंशातील चौदावी वारस होती. उमरशेख मिर्झा हे फरगाणा प्रांताचे शासक होते. बाबरचे आई व वडील हे दोघेही मध्य आशियातील कर्तबगार कुळातील होते. बाबराला तीन भाऊ व पाच बहिणी होत्या. मुलांमधे बाबर हा सर्वात मोठा होता. बाबराचे मूळ नाव झहिरुद्दीन होते. किचकट नावामुळे त्यांनी नाव बदलून बाबर केले.

फरगाणा प्रांताचे राजपद [संपादन]

बाबरचे वडील उमरशेख मिर्झा यांचा अपघाती मृत्यु झाल्यानंतर वंशपरंपरेच्या पद्धतीनुसार फरगाना प्रांताचे राजपद बाबरास मिळाले. बाबराचे वय तेव्हा बारा वर्षाचे होते. बाबर अगदी लहान वयातच मह्त्त्वाकांक्षी होता. इ.स. १४९७ मध्ये त्याला समरकंद जिंकून घेण्यात यश मिळाले.[१]

बाबरच्या आक्रमणाच्या वेळची भारतीय राजकीय स्थिती [संपादन]

बाबराच्या भारतावरील स्वाऱ्या [संपादन]

पानिपतच्या पहिल्या युद्धात बाबराच्या विजयाची कारणे [संपादन]

खानुआचे युद्ध [संपादन]

बाबराचे प्रशासन [संपादन]

बाबर साहित्यिक व कवी [संपादन]

संदर्भ [संपादन]

  1. मोगलकालीन भारताचा इतिहास (इ.स.१५२६ ते १७०७) प्राचार्य डॉ.एस.एस.गाठाळ. कैलाश पब्लिकेशन्स. औरंगाबाद. (पृ.क्र.३६ ते ६०)
Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: